शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

हे तर ‘खुनशी’ उद्यान !

By admin | Updated: June 5, 2016 00:03 IST

छत्री तलाव मार्गावरील निर्माणाधीन उद्यानाचे कुपंण जंगलातील वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. या कुंपणात अडकून शुक्रवारी एका हरणाचा मृत्यू झाला.

कुंपण झाले मृत्यूसापळा : आणखी एका वन्यजीवाचा मृत्यूवैभव बाबरेकर अमरावतीछत्री तलाव मार्गावरील निर्माणाधीन उद्यानाचे कुपंण जंगलातील वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. या कुंपणात अडकून शुक्रवारी एका हरणाचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी आणखी एक नीलगाय कुंपणात धडकून ठार झाली. जैवविविधतेच्या विस्तारासाठी निर्माण करण्यात आलेले हे उद्यान ‘खुनशी उद्यान’ ठरले आहे.छत्री तलावालगतच सामाजिक वनिकरणामार्फत स्व. उत्तमराव पाटील उद्यानाचे निर्माणकार्य सुरु आहे. या उद्यानाभोवताल तारेचे कुंपण असल्याने वन्यप्राण्यांना छत्री तलावावर तहान भागविण्यासाठी जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. या तारेच्या कुंपणाला नीलेश कंचनपुरेसह काही वन्यप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. मात्र, अद्याप त्यासंदर्भात सामाजिक वनीकरण व वनविभागाने कोणतीही दखल घेतली नाही. दरम्यान, एका आठवड्यापूर्वी या कुंपणात अडकून एक नीलगाय जखमी झाली होती. तसेच बुधवारी पहाटे एक हरिण तारांमध्ये अडकून गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यूदेखील झाला. अधिकाऱ्यांवर कारवाई कराअमरावती : शनिवारी एक नीलगाय तारेच्या कुंपणावर आदळून जागीच ठार झाली. तीन ते चार हरिण जखमी झालेत. ही बाब मार्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ वनविभागाला कळवून घटनास्थळी बोलावून घेतले होते. त्यामध्ये नीलेश कंचनपुरे उद्यानजवळ पोहोचले. वडाळी वनपरीक्षेत्र अधिकारी एच. व्ही. पडगव्हाणकर यांच्यासह शिकारी प्रतिबंधक पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि नीलगाईचा मृतदेह पशुवैद्यकीय चिकित्सकांकडे शवविच्छेदनाकरिता पाठविला आहे. यामध्ये वनविभागाने वनगुन्हा दाखल करून चौकशी सुरु केलीे. त्यामुळे आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न वन्यप्रेमींनी उपस्थित केला आहे. तारेच्या कुंपणामुळे नीलगाईचा मृत्यू झाला असून यासंदर्भात वन्यप्रेमींनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक मसराम यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तक्रारीतून वन्यप्रेमींकडून करण्यात आली आहे. जैवविविधता उद्यानातील हत्या थांबवाउद्यानाचे कुंपण वन्यप्राण्यासाठी जीवघेणे ठरत आहे. वनविभाग व सामाजीक वनीकरण यांच्या हट्टखोर धोरणांमुळे वन्यजीवाच्या जीवाशी खेळ सुरु आहे. त्यातच हरीण व निलगायीचा मृत्यू झाला असून अनेक वन्यप्राणी जखमी झाले आहेत. त्यामुळे या मृत्यूला कारणीभुत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक अविनाश मार्डीकर, उज्जल थोरात, सुरज कछवे, सुरज गवई, श्याम देशपांडे, आकाश मेटे, सुरज राऊत, धनजय नळस्कर, प्रवीण भस्मे, योगेश देवके, नीलेश कंचनपुरे, सागर मैदानकर यासह आदी वन्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)