शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खोपडा प्लॉट वाटपात अधिकाऱ्यांचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:24 IST

गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना प्रकल्प का रखडला? मुळात प्रकल्पाचे काम होऊच नये, यामध्ये आ.बोंडेंना स्वारस्य आहे. आ. यशोमतींनी प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठविल्यामुळे आतापर्यंत झोपलेले आ. बोंडे जागे झाले अन् सारवासारव करू लागले.

ठळक मुद्देविक्रम ठाकरे : रेकॉर्डमध्ये खोडतोड कशी? विभागीय उपायुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना प्रकल्प का रखडला? मुळात प्रकल्पाचे काम होऊच नये, यामध्ये आ.बोंडेंना स्वारस्य आहे. आ. यशोमतींनी प्रकल्पग्रस्तांसाठी आवाज उठविल्यामुळे आतापर्यंत झोपलेले आ. बोंडे जागे झाले अन् सारवासारव करू लागले. खोपडा ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये खोडतोड कुणी केली?, या भूखंडवाटपात मोठा आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे व हे सर्व अधिकाºयांनीच केल्याचा आरोप वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांनी गुरूवारी केला. याविषयीचे निवेदन विभागीय उपायुक्त प्रमोद देशमुख यांना दिले.खोपडा पुनर्वसनासाठी ४९८ भूखंड वाटप करायचे होते. आता, यामध्ये ५१६ ने वाढ झाली. २००७ च्या ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये खोडतोड करून नंतर शुद्धीपत्रक काढल्यामुळे या प्रकरणात ग्रामसेवक, महसूली, भूमीअभिलेख अधिकाºयांचे हात गुंतलेले आहे. काही लाभार्थ्यांची भूखंड मर्यादा जाणीवपूर्वक वाढविली. बांधकाम नसताना खुल्या भूखंडावर बांधकाम दाखवून मोबदला घेण्याच्या तयारीत आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांच्या संमतीनेच हा प्रकार झाला आहे. यातही पुनर्वसन विभागाने कोणत्याही प्लॉटला नंबर न देता लॉटरी पद्धतीने व निवडणुकीच्या तोंडावर जलदगतीने प्रक्रिया आरंभली आहे. याच पद्धतीत भूखंडवाटपात मोठा घोटाळा होत आहे. हे प्लॉटवाटप अमान्य असल्याचे ठाकरे यांनी उपायुक्तांना सांगितले. पुनर्वसनात भूखंड घोटाळा झाल्याची बाब आम्ही वारंवार जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणली. तथापि, अधिकाऱ्यांना अभय दिल्याने ते आता निर्ढावले आहेत. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विक्रम ठाकरे यांनी केली. यावेळी तिवसा नगरपंचायतीचे अध्यक्ष वैभव वानखडे, वरूड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश काळे, चंद्रकांत जवंजाळ, विलास कोठाळे, प्रकाश कुरवाळे, दशरथराव महल्ले आदी उपस्थित होते.टोल नाक्यामध्ये ज्यांनी दलाली घेतली, अप्प वर्धा प्रकल्पाच्या मासेमारीच्या कंत्राटात ज्यांनी दलाली खाल्ली व तीन नगरपरिषदांचा टोल ज्यांनी वाढविला त्या झोपी गेलेल्या आमदाराला निवडणुकीच्या तोंडावर आता जाग आली आहे. नागरिकांना भूलथापा देत आहेत- विक्रम ठाकरे, सभापती,वरूड पंचायत समितीअजय लहानेंची चौकशी करायाबाबत १४ जानेवारील जिल्हाधिकाऱ्यांसी चर्चा झाली. त्यावेळी या घोटाळ्याचे सर्व पुरावे सादर केले. त्यावर चौकशी करण्याऐवजी वेगळा फॉरमुला अवलंबत आहेत. जिल्हा भूसंपादन अधिकाºयाकडे न्याय मागण्यास गेले असता ते हाकलून लावतात. अपमान करतात लहाने हे आ. बोंडे यांचे नाव घेऊन आमच्याशी चर्चा करतात. या भष्ट अधिकाºयांवर कारवाईची मागणी ठाकरेंनी केली.रेकॉर्डमध्ये खोडतोड, सचिवाला निलंबित कराखोपडा येथील भूसंपादन प्रकरणात गावठान भूसंपादनासाठी कलम १९ चे अधिसुचनेत बेकायदेशीर दुरूस्ती करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अधिक मोबदला मिळण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या घरांचे बांधकाम दाखविलेले आहे. राजकीय दबावातूनच हा प्रकार झाला असल्याने ग्रामपंचायत सचिवाला जबाबदार धरून चौकशीअंती निलंबनाची मागणी विक्रम ठाकरे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली आहे.