लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : मंदिराच्या प्रवेशद्वाराला खेटून जाणाऱ्या महामार्गाच्या उंचीमुळे मंदिरात प्रवेशाकरिता अडचणीचा होईल म्हणून विरुद्ध बाजूने रस्ता करण्याची मागणी अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळे परतवाडा-अंजनगाव-अकोट राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या पर्यायाने रस्त्याच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे.परतवाड्याकडून अंजनगाव सुर्जी मार्गे अकोटकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. पुलाचे बांधकाम वगळता हा मार्ग पूर्णत्वास येऊन ठेपला आहे. पांढरी खानमपूरपासून पुढे अंजनगाव सुर्जी शहरातून अकोट मार्गाकडील हद्दीपर्यंत महामार्गाचे काम पॉवर हाऊसजवळील हायटेन्शन वीजखांब रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे एकतर्फी झाले आहे. त्यातच शहरातील खोडगाव नाका येथील विठ्ठल मंदिराचे प्रवेशद्वार तेथील पुलाच्या उतारामुळे बाधित होत असल्याने या पुलाची तक्रार विठ्ठल मंदिर संस्थानमार्फत करण्यात आली आहे. त्याचे काम थांबविण्यात आले आहे. याबाबत विठ्ठल मंदिराचे विश्वस्त व महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. महामार्गाची रुंदी काही धार्मिक ठिकाणांमुळेही बाधित झाली. मात्र, महामार्ग प्रशासनाने तेथे माघार घेऊन काम पुढे नेले. अंजनगाव-अकोट रोडवरील जुन्या बसस्थानक परिसरात महामार्गाची उंची नजीकच्या शहानूर नदीवरील उंच पुलामुळे वाढविली आहे. त्यामुळे येथील दुकानांना प्रवेश करण्यात अडचणी निर्माण झाली आहे. चारचाकी वाहन दुकानापर्यंत जात नाहीत. ही दुकाने अंदाजे पाच ते सहा फुट रस्त्याच्या खाली गेली आहेत. नदीवरील पुलामुळे बाजूच्याया घरांचे अतिक्रमण पाडले. पण, अजूनही हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामात अडथळा येत आहे.अतिक्रमणाकडे वक्रदृष्टीमहामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण कायम असून, देखभाल व दुरुस्तीच्या कामात सुरुवात झाल्यानंतर प्रशासनाची वक्रदृष्टी त्याच्याकडे वळणार हे निश्चित आहे. महामार्गाच्या हद्दीचे नियम स्पष्ट असून त्याबाबतचे महामार्ग प्रशासनाचे धोरणसुद्धा स्पष्ट आहे. मात्र, या नियमांची अंमलबजावणी महामार्गाचे काम रखडल्यामुळे सध्या तरी स्थगित झाली आहे.पॉवर हाऊसनजीक महामार्ग एकतर्फीमहावितरणच्या सहकार्याअभावी महामार्गाचे अंजनगाव सुर्जी शहराच्या हद्दीत काम रखडले आहे. रस्त्यावरील विजेचे खांब, डीबी हटविण्यासाठी अंदाजपत्रक मोठ्या रकमेचे असल्याने प्रशासकीय मंजुरी घेण्याच्या कालावधीत पॉवर हाऊसनजीक हा मार्ग एकतर्फी झाला आहे.महामार्गात हायव्होल्टेज खांबमहामार्गाच्या ऐन मध्ये आलेले हायहोल्टेज विजेचे खांब आहे. तेथून वाहनांची वर्दळ असल्यामुळे हे विजेचे खांब हटविण्यासाठी लागणारा विलंब अनाकलनीय आणि जोखमीचा आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात खोडगाव नाका पुलामुळे खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 05:00 IST
परतवाड्याकडून अंजनगाव सुर्जी मार्गे अकोटकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. पुलाचे बांधकाम वगळता हा मार्ग पूर्णत्वास येऊन ठेपला आहे. पांढरी खानमपूरपासून पुढे अंजनगाव सुर्जी शहरातून अकोट मार्गाकडील हद्दीपर्यंत महामार्गाचे काम पॉवर हाऊसजवळील हायटेन्शन वीजखांब रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे एकतर्फी झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात खोडगाव नाका पुलामुळे खोळंबा
ठळक मुद्देविठ्ठल मंदिरात प्रवेशास अडचण : रस्त्यात हायव्होल्टेज खांब, अतिक्रमण कायम