शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

शासन मदतनिधीत संयुक्त सातबाऱ्याचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:17 IST

अमरावती : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटसह एनडीआरएफच्या मदतीपासून जिल्ह्यातील किमान ५० हजारांवर शेतकरी वंचित राहिले आहेत. हा निधी ...

अमरावती : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटसह एनडीआरएफच्या मदतीपासून जिल्ह्यातील किमान ५० हजारांवर शेतकरी वंचित राहिले आहेत. हा निधी मिळण्याला संयुक्त सातबाराचा अडसर येत असल्याने शेतकऱ्यांनी खातेफोड करणे व महसूल विभागाने यासाठी अभियान राबविणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात पाच वर्षांपासून शेतकऱ्यांवर सातत्याने संकट ओढावल्याने एनडीआरएफच्या निकषाने, तर कधी निकषापेक्षा जास्त मदतनिधी शासनाद्वारे उपलब्ध होत आहे. हा निधी मात्र संयुक्त सात-बारा असल्याने बाधित कुटुंबांना मिळू शकलेला नाही. बहुतेक कुटुंबे विभक्त झालेली आहेत. मात्र, वडिलोपार्जित शेतीच्या सातबाऱ्याची फोड झालेली नाही. त्यामुळे शासन मदतनिधी मिळाल्यास तो फक्त ज्याच्या नावाने सात-बारा आहे त्यालाच लाभ मिळाला. अन्य लाभार्थी शेतकरी मात्र वंचित राहिले आहेत.

बरेचदा सामाईक क्षेत्र असल्यामुळे मदतनिधी द्यायचा तरी कुणाला, असा प्रश्न शासन यंत्रणेसमोर निर्माण होतो. प्रसंगी वादही निर्माण होतात. यासाठी एका व्यक्तीच्या नावे संमतिपत्र आवश्यक आहे, असा तोडगा महसूल विभागाने काढला आहे. सर्वसंमतीने व शपथपत्राद्वारे एका व्यक्तीला अधिकार देऊन व त्या व्यक्तीच्या बँक खातेक्रमांक पटवाऱ्याला देऊन यावर मदत जमा करण्याचे प्रकार होत आहेत. अनेकदा संयुक्त बँक खाते असल्यानेही शासन मदत मिळू शकलेली नाही. अशावेळी महसूल विभागाला दोघांच्याही स्वाक्षरीने लिहून दिल्यानंतर एका जणाच्या खात्यात निधी जमा झालेला आहे.

बॉक्स

पोटहिस्साद्वारे सातबारा हा पर्याय

तहसीलदारांकडे पोटहिस्सासंदर्भात संबंधित सर्व व्यक्तींच्या स्वाक्षरीसह अर्ज केल्यानंतर सात-बारा विभक्त करता येतात. त्यानंतर पोटहिस्साधारकांच्या नावे सात-बाराची नोंद झाल्यानंतर त्या खातेदारांना शासनमदत मिळू शकते. याशिवाय राजस्व अभियानातदेखील सात-बाऱ्याची फोड करता येत असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

कोट

तहसीलदारांकडे पोटहिस्सासंदर्भात अर्ज करून सात-बारा फोड करता येते. हा एक सोपा व सहज पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय वेळोवेळी असणाऱ्या राजस्व अभियानातही सातबाऱ्याची फोड करता येते.

रणजित भोसले

उपजिल्हाधिकारी (महसूल)

बॉक्स

सातबारा, शेतकरी, धारणक्षेत्राची तालुकास्थिती (हेक्टर)

तालुका खातेदार धारण क्षेत्र ५ एकरा आतील ५ एकरावरील भूमिहीन

अमरावती ३९०७९ ५८९१२ ३२१४२ ३८९३ २२००५

भातकुली ३३४२४ ४८९२४ २१६३१ ८९१९ १५००७

नांदगाव ४११४७ ५८५८५ ३०६७१ ९७६९ १६३१५

चांदूर रेल्वे २३४६९ ४३२६९ ५१२४ १८०६७ ९१५३

धामणगाव २८९४५ ५४५९९ १८७४९ १०१९६ १०४३०

तिवसा २९२४१ ४१,४८६ २२५२१ ०० ७८६९

मोर्शी ४७००० ५६७२२ ३३३८४ ७४०५ १८०२१

वरूड ३९६३३ ५४३८५ १७३११ २२४२० ४३१७६

अचलपूर ३७०८७ ५३६७४ २९७२८ ११३९० १९८२५

चांदूर बाजार ५२०३२ ६१०४१ १३६१८ ३८४४४ १९३०६

दर्यापूर ५५०१९ ४१६९७ ३८१५४ १४४३४ ३०४४९

अंजनगाव ३४७९६ २६४६१ २३८६२ ७४६४ १७१८८

धारणी २०५२२ ४६२७२ १३५०९ ७०१३ ५५८१

चिखलदरा ११४१६ २७९४८ ६४८९ ५६८१ ४०७७

एकूण ४९२७१० ६५२९७७ ३०४२२४ १६३९०७ २३५४००

पाईंटर

एकूण खातेदार : ४,९२,७१०

शेतकऱ्यांचे धारणक्षेत्र :६,५२,२७७ हेक्टर

एका शेतकऱ्यामागे सरासरी धारणक्षेत्र :१.३२ हेक्टर

पाच एकरांतील शेतकरीसंख्या : ३,०४,२२४

पाच एकरावरील खातेदार : १,६३,९०६

जिल्ह्यातील भूमिहीन मजूर : २,३५,४००