शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

खरीपाला अडीच लाख क्विंटल बियाण्यांची गरज

By admin | Updated: April 28, 2016 00:11 IST

यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. या हंगामासाठी विविध पिकांच्या २ लाख ३४ हजार १८२ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे.

लगबग वाढली : बीटीच्या साडेदहा लाख पाकीटांची नोंदणीगजानन मोहोड अमरावतीयंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. या हंगामासाठी विविध पिकांच्या २ लाख ३४ हजार १८२ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यासाठी कृषी विभागाद्वारे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ४७ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता आहे तर बीटीसाठी साडेदहा लाख पाकीटांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. या व्यतिरिक्त संकरीत कपाशीचे ४ हजार ७२५ क्विंटल बियाणे लागणार आहे. कृषी विभागाद्वारा यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १४ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जून महिन्यात वेळेवर मान्सूनचे आगमन झाल्यास या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. या हंगामासाठी कृषी विभागाद्वारे बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. संकरीत ज्वारसाठी ३० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी ४८०० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. बाजारा पिकासाठी १५ हेक्टर क्षेत्राला ६ क्विंटल बियाणे लागणार आहे. मक्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. याकरिता १५६० क्विंटल बियाणे लागणार आहे. तुरीसाठी १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्राला ९,७०० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. मुगासाठी ३५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. या पिकाला ३५२० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. उडीदासाठी १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी १२५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. भुईमुगासाठी ३ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे व ७५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तिळासाठी १०० हेक्टरला १० क्विंटल बियाणे लागणार आहे. सूर्यफुलासाठी २५० हेक्टर क्षेत्रामध्ये सव्वा क्विंटल बियाणे लागणार आहे. सोयाबीनसाठी २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी १,४७,११८ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. संकरीत कापसासाठी २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले.वरूड तालुक्यात बीटी पाकीटांची सर्वाधिक मागणीयंदाच्या खरीप हंगामासाठी साडेदहा लाख बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ४०,००० पाकीटे लागणार आहे. भातकुली ३२५००, नांदगाव ४२५००, चांदूररेल्वे ५२५००, तिवसा ६००००, धामणगाव १,०७,५००, मोर्शी ११००००, वरूड १३२५००, अंजनगाव सुर्जी ९२५००, अचलपूर १०२५००, दर्यापूर १२२५००, चांदूरबाजार १०२५००, धारणी ४७५०० चिखलदरा तालुक्यात ५००० पाकीटांची मागणी नोंदविण्यात आली.असे लागणार तालुकानिहाय बियाणेयंदाच्या खरीपासाठी १६६१५५ क्विंटल बियाणे लागेल. यामध्ये अमरावती तालुक्यात १५७०२ क्विंटल, भातकुली १३९२४, नांदगाव २०२८०, चांदूररेल्वे १३२८६, तिवसा १२०२८, धामणगाव ११०९९, मोर्शी १२८५६, वरूड ९६९४, अंजनगाव १०,३९५, अचलपूर ९३७५, दर्यापूर ११२३४, चांदूरबाजार ११०९५, धारणी ८१५५ व चिखलदरा तालुक्यात ७०३४ क्विंटल बियाणे लागणार आहे. महाबीज देणार ६६,२०० क्विंटल बियाणेशासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या महाबीज द्वारा यंदा ६६ हजार २०० क्विंटल उपलब्ध होणार आहे. यामध्ये संकरीत ज्वार १८०० क्विंटल, मका ६००, तूर २५००, मूग १०००, उडीद २००, सोयाबीन ६०,०००, संकरीत कापूस १०, सुधारीत कापूस ६० व धान तसेच ईतर पिकांचे ३० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे. बीटीसाठी साडेदहा लाख पाकीटांची मागणीकापूस पिकासाठी १,८९,६४० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मागील वर्षी १,८६,६६५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती. यंदाच्या हंगामासाठी २,१०,००० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी साडेदहा लाख पाकीटांची मागणी कृषी विभागाद्वारा नोंदविण्यात आली आहे. यामध्ये बीजी-१ वाणाचे ३७,५०० पाकीटे व बीजी-२ वाणाचे १०,१२,५०० पाकीटांची मागणी नोंदविण्यात आली आहे.