शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

खरिपाला हवे १.५१ लाख क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:44 IST

यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

ठळक मुद्देसोयाबीनला सर्वाधिक मागणी : महाबीजचे ६६ हजार क्विंटल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला किमान १ लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यापैकी ७१ हजार ४९० क्विंटल बियाणे सार्वजनिक, ८० हजार ५०३ क्विंटल खासगी, तर ६६ हजार ३९० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरक्षेत्र प्रस्तावित आहेत. यासाठी खते-बियांण्यांचे नियोजन कृषी विभागाद्वारा सुरू आह. गतवर्षीच्या तुलनेत यंदा क्षेत्रवाढ होत असल्याने बियाण्यांची मागणीदेखील वाढणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये १.१७ लाख क्विंटल, २०१६ मध्ये १.४३ लाख क्विंटल, २०१७ मध्ये १.३१ लाख क्विंटल बियाणे लागले होते. यंदांच्या हंगामात क्षेत्रवाढीची शक्यता असल्याने किमान १.५१ लाख क्विंटल बियाणे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १३ हजार ४९४ क्विंटल, भातकुली १२ हजार ६९५, नांदगाव खंडेश्वर १८ हजार १९७, चांदूर रेल्वे १२ हजार ७९६, तिवसा १० हजार ७६३, धामणगाव रेल्वे १० हजार ७१३, मोर्शी १० हजार ७८१, वरूड ९ हजार ४४७, अंंजनगाव सुर्जी १० हजार १४४, अचलपूर ८ हजार ७२८, दर्यापूर ८ हजार ६३५, चांदूर बाजार १० हजार ८५१, धारणी ७ हजार २९० व चिखलदरा तालुक्यात ५ हजार ६२५ क्विंटल असे एकूण १ लाख ५० हजार २९ क्विंटल बियाण्यांची गरज आहे.यंदाच्या हंगामात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असल्यामुळे सर्वाधिक १,३२,५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. संकरित कापूस ४,१६३ क्विंटल, सुधारित ६०० क्विंटल, तूर ६२४० क्विंटल, मूग १३८६ क्विंटल, संकरित ज्वार २,८०० क्विंटल, तर उडदाचे २३४० क्विंटल बियाणे लागणार आहे.बीटीच्या ९.२५ लाख पाकिटांची मागणीमागील हंगामात सर्वच कंपनीच्या वाणावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा विशिष्ट अशा कंपनीच्या वाणाची मागणी नाही. यंदा अमरावती तालुक्यात ४०६०० पाकिटे, भातकुली ३६०००, नांदगाव खंडेश्वर २२५००, चांदूर रेल्वे ३६१००, तिवसा ६७६००, धामणगाव रेल्वे १११५००, मोर्शी १०८५००, वरूड १३३०००, अंजनगाव सुर्जी ६७५००, अचलपूर ८४०००, दर्यापूर ८२०००, चांदूर बाजार ९५०००, धारणी ३६१००, चिखलदरा तालुक्यात ४६०० पाकिटांची आवश्यकता आहे.यंदा १.०६ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची गरजयंदाच्या हंगामात १,०६,८२० मे. टन रासायनिक खतांची गरज आहे. यामध्ये सर्वाधिक युरिया ३४,१०० मे.टन, डीएपी १८,६६०, एमओपी ७,९६० मे. टन लागणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ८,५४६ मे.टन, भातकुली ५,८७५, नांदगाव खंडेश्वर ४,८०७, चांदूररेल्वे ५,३४१, धामणगाव रेल्वे ६,९४३, तिवसा ७,४७७, मोर्शी १०,६८२, वरूड १२,८९८, चांदूर बाजार ८,०१२, अचलपूर ११,२१६, ांजनगाव सुर्जी ९,०८०, दर्यापूर ९,६१४, धारणी ५,३४१ व चिखलदरा तालुक्यात १,०६८ मे.टन रासायनिक खतांची गरज आहे.