९५.४ टक्के पेरणी : २,८४,८०१ हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्रप्रभाकर भगोले चांदूररेल्वेयंदाच्या खरीप हंगामासाठी सरासरी ७ लाख २८ हजार ११२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २८ जुलै अखेर ६ लाख ९४ हजार ६०४ हेक्टर मध्ये पेरणी आटोपली, याची ९५.४ टक्केवारी आहे. संततधार पावसामुळे मात्र काही भागातील पिके पिवळी पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्ह्यात २० जूनला पावसाचे आगमन झाले. त्यानंतर खरीपांच्या पेरणीला वेग आला. महिनाभर सतत पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामाच्या पेरणी आटोपल्या आहे. सद्यस्थितीत चांदूर रेल्वे तालुक्यात ३९ हजार ४४९ हेक्टर मध्ये पेरणी झाली. ही ९२.५ टक्के आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४२ हजार ४९१ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. ही ९३.४ टक्केवारी आहे. अचलपूर तालुक्यात ४२ हजार ९७ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ही ८७ टक्के आहे. चांदूरबाजार तालुक्यात ५० हजार ३२६ हेक्टरमध्ये पेरणी झाली. धामणगाव रेल्वे तालुक्यात ५३ हजार ५७३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली, याची ९६.६ टक्केवारी आहे. तिवसा तालुक्यात ४३ हजार ७८ हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९४.८ टक्केवारी आहे. मोर्शी तालुक्यात ५९ हजार ७३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली याची ९४ टक्केवारी आहे. वरुड तालुक्यात ४७ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली याची ९७.८ टक्केवारी आहे. दर्यापूर तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक ७२ हजार ७४१ क्षेत्रात पेरणी झाली ही १०३ टक्केवारी आहे. धारणी तालुक्यात ४७ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालीही १०२ टक्के आहे. चिखलदरा तालुक्यात २३ हजार २९९ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली असून याची टक्केवारी ९२ एवढी आहे. अमरावती तालुक्यात ५६ हेक्टर ४७२ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली ९७.७ ही १०१ टक्केवारी आहे, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६६ हजार ४७ हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी आटोपली ही ९७.५ टक्केवारी आहे. नादगांव तालुक्यात सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे ३ लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना २ लाख ८४ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. याची ८८.१ एवढी टक्केवारी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील वर्षी कापसाचे उत्पादन घटल्याने यावर्षी सर्वाधिक ५० हजार २७८ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. याची टक्केवारी ११८ एवढी आहे, तर सर्वात कमी २६ हजार ८० हेक्टर क्षेत्रावर वरुड तालुक्यात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. याची टक्केवारी १८ आहे.वरुड तालुक्यात सर्वाधिक कपाशीजिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी कपाशीचे १ लाख ९३ हजार २६१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत २८ जुलैपर्यंत १ लाख ७९ हजार २३० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. ही ९२.७ टक्केवारी आहे. सर्वाधिक २६ हजार ७१४ हेक्टर क्षेत्र वरुड तालुक्यात आहे. येथे सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक व ११८ टक्के क्षेत्रात कपाशीची पेरणी झाली आहे. सर्वात कमी ७३१ हेक्टर क्षेत्रावर चिखलदऱ्यात पेरणी करण्यात आली आहे.
६ लाख ९४ हजार हेक्टरवर स्थिरावला खरीपहंगाम
By admin | Updated: July 31, 2016 00:06 IST