शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पिंगळादेवी गडावर आज 'खापरी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

दोनशे वर्षांच्या परंपरेनुसार खापरीचा कार्यक्रम होत आहे. ब्राम्हण पुजारी नारायणराव शंकरराव मारन्डकर हे कुटुंबासह नवरात्र महोत्सवात पिंगळादेवीची पूजाअर्चा, श्रृंगारासह आराधनेकरिता दाखल झाले आहेत. ७० वर्षीय नारायणराव वयाच्या चौदाव्या वर्षापासून खापरी उचलत आहे. देवीच्या भक्ताचे दु:ख दूर व्हावे, त्यांच्यावरील संकटे टळावे, देवीचा आशीर्वाद भक्तांना मिळावा याकरिता खापरीमध्ये होमहवन केले जाते. आतमध्ये कापुराचा दीप अग्निदेवतेला साक्षी मानून प्रज्वलित केले जाते.

ठळक मुद्देतप्त मडके घेऊन प्रदक्षिणा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरात भक्तांचा शुकशुकाट

कैलास ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कलेहेगाव : मातीच्या मडक्याला शुद्ध करून अग्निदेवाच्या साक्षीने पिंगळदेवीसमोर सप्तशतीच्या पठणात १६ प्रकारच्या सामग्रीचे हवन आणि होमहवनाने तप्त झालेल्या मडके म्हणजे ह्यखापरीह्ण. ही खापरी पिंगळाई गडावर २३ ऑक्टोबरला अष्टमी-नवमीला रात्री १२ वाजता उचलली जाणार आहे.अंगावर शहारे आणणारा भक्तांना आश्चर्यचकित असा हा सोहळा आहे. लालबुंद खापरी पुजारी तळहातावर, डोक्यावर घेऊन सुसाट वेगाने देवीला प्रदक्षिणा लावतो. तरीही त्याच्या तळहाताला, डोळ्याला कुठलीच इजा होत नाही, हे विशेष.दोनशे वर्षांच्या परंपरेनुसार खापरीचा कार्यक्रम होत आहे. ब्राम्हण पुजारी नारायणराव शंकरराव मारन्डकर हे कुटुंबासह नवरात्र महोत्सवात पिंगळादेवीची पूजाअर्चा, श्रृंगारासह आराधनेकरिता दाखल झाले आहेत. ७० वर्षीय नारायणराव वयाच्या चौदाव्या वर्षापासून खापरी उचलत आहे. देवीच्या भक्ताचे दु:ख दूर व्हावे, त्यांच्यावरील संकटे टळावे, देवीचा आशीर्वाद भक्तांना मिळावा याकरिता खापरीमध्ये होमहवन केले जाते. आतमध्ये कापुराचा दीप अग्निदेवतेला साक्षी मानून प्रज्वलित केले जाते. सप्तशक्तीचा पाठ होतो. १६ प्रकारच्या सामग्रीचे हवन सोबतच तुपाची आहुती दिली जाते. चार तासांपेक्षा अधिक वेळ हवन होत असल्याने मडके लालबुंद होतात. या पात्रालाच ह्यअंबादेवीची खापरीह्ण म्हटले जाते. ही खापरी नारायणराव मारन्डकर तळहातावर किंवा डोक्यावर घेतात. त्यावेळी त्याच्यासोबत त्यांचे कुटुंबातील व्यक्ती पेटती मशाल घेऊन चालतात. ढोलटाळांच्या गजरात सुसाट वेगाने देवीच्या मंदिराला पाच वा अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात. अंगावर शहारे आणणारा हा प्रकार अनुभवण्यासाठी विदर्भ, परप्रांतातून भाविक येथे हजेरी लावतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भक्ताच्या अनुपस्थितीत हा पारंपारिक सोहळा शुक्रवारी पार पडणार आहे. यावर्षी नवरात्र उत्सवात प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने गडावरील मंदिरच नव्हे तर संपूर्ण पिंगळादेवीचा गडच बंद केला आहे. त्यामुळे संस्थानचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुकाने व बेलफूल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ५०० वर्षानंतर पिंगळादेवीचे मंदिर बंद करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया एका वृद्ध भक्ताने दिली.

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या