शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमचे मॉडेल कॉलेज तेलंगणा राज्याने पळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 14:02 IST

केंद्र शासनाच्या रूसा योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेज तेलंगणा राज्यातील खम्मम येथे नेण्यात आले आहे.

अमरावती -  केंद्र शासनाच्या रूसा योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेज तेलंगणा राज्यातील खम्मम येथे नेण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नवीन मॉडेल कॉलेजसंदर्भात राज्य शासनाकडे मुदतीत सविस्तर विकास आराखडा (डीपीआर) सादर केला नाही. त्यामुळे रूसाने ३० जुलै २०१८ रोजी झालेल्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. एवढेच नव्हे मॉडेल कॉलेज निर्मितीसाठी मंजूर १२ कोटी रुपयांचे अनुदान देखील रद्द केले आहे.

अमरावती विद्यापीठात ५ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत कार्यक्रम पत्रिकेवरील अनुक्रमांक ९८ नुसार रूसा योजनेंतर्गत वाशिम येथे प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेज साकारण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने मॉडेल कॉलेजसाठी जागा शोधणे, स्थळनिश्चिती करणे, पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात त्रिसदस्यीय समितीचे गठण करण्यात आले. मात्र, आता हे मॉडेल कॉलेज रूसाच्या ‘पीएबी’ने तेलंगणा राज्यात मंजूर केल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आशांवर विरजण पडले.

दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने वाशिम जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांना १३ मे २०१८ पर्यंत मॉडेल कॉलेजसंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे पत्राद्वारे कळविले होते. त्यानंतर महाविद्यालयांकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी व प्रस्तावाची शिफारस करण्यासाठी समिती गठीत झाली. या प्रस्तावाची माहिती राज्य शासनाच्या रूसा कार्यालयाकडे १५ मे २०१८ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे. मात्र, रूसाच्या ‘पीएबी’कडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून वाशिम येथे प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेजसंदर्भात २५ जून २०१८ पर्यंत ‘डीपीआर’ सादर करण्यात आला नव्हता, ही बाब बैठकीत स्पष्ट झाली आहे. केंद्र सरकारने रूसा अंतर्गत राज्यात पालघर आणि वाशिम येथे दोन नवीन मॉडेल सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा निर्गमित करण्यात आली होती. मात्र, अमरावती विद्यापीठाच्या लेटलतिफीमुळे वाशिम येथे नवीन मॉडेल कॉलेज तूर्तास सुरू करता येणार नाही, असे संकेत आहेत.

वाशिम येथील प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेजसंदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग स्तरावर कार्यवाही करण्याबाबत गत आठवड्यात संचालक श्रीकांत माने यांनी कळविले आहे. आता राज्य शासन निर्णय घेणार आहे. मॉडेल कॉलेज साकारण्यासाठी विद्यापीठस्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे.- मंगेश वरखेडे, संचालक, विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 

टॅग्स :TelanganaतेलंगणाAmravatiअमरावती