‘ऐकावे ते नवलच’ : सायकलस्वाराची सफरनेरपिंगळाई : आतापर्यंत आपण अनेक नाविण्यपूर्ण नवलाईच्या गोष्टी ऐकल्या किंवा पाहिल्यात. अनेक व्यक्तींनी अनेक साहस केले. त्यापैकी काही व्यक्तींनी सायकलवरून जिल्हा, प्रदेश, राज्य, देश भ्रमण केले. परंतु साऊथ आॅफ्रिकेच्या एका व्यक्तीने चक्क सायकलने जगभ्रमण सुरू केले असून सध्या ही व्यक्ती आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये फिरत आहे. याचे नाव आहे 'केयडन क्लीन हंस'.साऊथ आॅफ्रिकेच्या केयडन क्लीन हंस हा ३५ वर्षीय इसम एकटाच सायकलने दहा वर्षापूर्वी जगभ्रमंती करिता निघाला. या दहा वर्षांत त्याने ५० देशांचा दौरा करून ६० हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. तो सध्या अमरावती जिल्ह्यात असून छिंदवाडा मार्गे नेपाळला जात आहे. सायकलवरून प्रवास करताना त्याला आलेले अनुभव व भारतातील लोकांची आत्मियता प्रभावित करणारी असल्याचे सांगितले. भारत हा महात्मा गांधीचा देश असल्याचा उल्लेख केयडनने आवर्जून केला. (वार्ताहर)
जगभ्रमंतीसाठी निघालेला केयडन पोहोचला जिल्ह्यात
By admin | Updated: March 28, 2017 00:06 IST