शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कुहृयात पंढरीच्या वारकऱ्यांचा मेळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:05 IST

कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला रुक्मिणीच्या माहेरी दहीहंडीसाठी वारकऱ्यांचा मेळा असतो. त्याच्या एक दिवस आधी तेथून दहा किलोमीटरवरील कुऱ्हा येथे तिवसा रोडवरील खुल्या जागेत शुक्रवारी दुपारी रिंगण सोहळा पार पडला. विदर्भातून आलेल्या पालख्यांसह हजारो भाविकांची यावेळी उपस्थिती होती.

ठळक मुद्देनेत्रदीपक रिंगण सोहळा : विठ्ठलाच्या गजरात रमल्या पालख्या, आज शासकीय महापूजा

रीतेश नारळे ।लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला रुक्मिणीच्या माहेरी दहीहंडीसाठी वारकऱ्यांचा मेळा असतो. त्याच्या एक दिवस आधी तेथून दहा किलोमीटरवरील कुऱ्हा येथे तिवसा रोडवरील खुल्या जागेत शुक्रवारी दुपारी रिंगण सोहळा पार पडला. विदर्भातून आलेल्या पालख्यांसह हजारो भाविकांची यावेळी उपस्थिती होती. या सोहळ्याला उपस्थित मान्यवर महिलांनाही यावेळी फुगडीचा फेर धरण्याचा मोह झाला. विठ्ठलनामाच्या गजरात भाविक दंग झाले होते.सोहळ्याचे आयोजन हभप रंगराव टापरे महाराज यांंच्या अध्यक्षतेखाली झाले. मुक्कामी असलेल्या २५ पालख्यांनी ८ वाजता ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात करून दुपारी १२ वाजता रिंगणस्थळी दाखल झाल्या. आ. यशोमती ठाकूर, ना. नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, नवनीत राणा, निवेदिता चौधरी, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी सभापती सीमा सावळे, माजी आमदार साहेबराव तट्टे, अच्युत महाराज सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुधीर दिवे, किरण पातूरकर, सरपंच विजयसिंह नाहाटे, पं.स. सभापती अर्चना वेरुळकर, उपसभापती लुकेश केने, सदस्य मंगेश भगोले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रीतेश पांडव, संदीप आमले, रविराज देशमुख, भामटी महाराज आश्रमचे हभप ज्ञानेश्वर महाराज पातशे यांच्यासह जिल्हाभरातून भाविक उपस्थिती होती. दुपारी ४ वाजता पालख्यांनी कौंडण्यपूरकडे प्रस्थान केले. संगप्पा हुंडीवले, राजू बिंड, नरेश वाडी, राजू टेकाळे, श्याम इखार, डॉ. पाचघरे, सुभाष आसरे, रामेश्वर पाचगडे यांच्यासह ग्रामस्थांनी आयोजनाकरिता परिश्रम घेतले. कुहृयाचे ठाणेदार सुनील किणगे व प्रभारी तहसीलदार पंधरे यांची पूर्णवेळ उपस्थिती होती.दरम्यान, कौंडण्यपूर इथे शासकीय महापूजा व दहीदांडीचा कार्यक्रम शनिवारी होईल. पंढरपूरप्रमाणे येथेही २०१२ पासून शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. दरवर्षी येथे शासनाचे प्रतिनिधी पूजेला उपस्थित असतात. २४ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता शासकीय महापूजा व दुपारी ५ वाजता येथील गोकुळपुरीत दहीहंडी होणार आहे.