शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

वनकर्मचारी-काठेवाडीत संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:40 IST

वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत कोंडेश्वर परिसरातील राखीव वनात चरत असलेली काठेवाडी गुरे ताब्यात घेताना वनकर्मचारी आणि काठेवाडी यांच्यात संघर्ष झाला. काठेवाडींनी गुरे पळवून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देबडनेरा पोलिसांत तक्रार : उपवनसंरक्षकांची पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत कोंडेश्वर परिसरातील राखीव वनात चरत असलेली काठेवाडी गुरे ताब्यात घेताना वनकर्मचारी आणि काठेवाडी यांच्यात संघर्ष झाला. काठेवाडींनी गुरे पळवून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. यावेळी पोलिसांनादेखील पाचारण करण्यात आले होते, हे विशेष.दरवर्षी पावसाळा सुरू होताच बडनेरा, कोंडेश्वर, चिरोडी, पोहरा, वडाळी, माळेगाव, अंजनगाव बारी, भानखेडा भागात काठेवाडी गुरांसह मेंढपाळ खासगी जागेवर राहुट्या करून राखीव वनात अवैध चराई करतात. त्यामुळे वनविभागाने काठेवाडी गुरे, मेंढपाळांविरुद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे जंगल गस्तीवर असताना त्यांना राखीव वनांत काठेवाडी गुरे आढळली. त्यांनी ही गुरे ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र, काठेवाडींनी २० ते २५ गुरे पळवून नेली. काठेवाडींनी यावेळी वनाधिकारी यांच्याशी वाद घातला. त्यानंतर डीएफओ मिणा यांच्या मार्गदर्शनात वडाळीचे आरएफओ कैलास भुंबर, वनपाल विनोद कोहळे, राजेश घारगेसह २५ ते ३० वनकर्मचाऱ्यांनी या भागात कोम्बिंग आॅपरेशन राबविले. बडनेराचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी घटनास्थळी आले. याबाबत बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.डीएफओंचा पोलीस आयुक्तांना फोनकोंडेश्वर परिसरात काठेवाडींकडून वनकर्मचाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या, शिवीगाळ केली जात असताना, घटनास्थळी पोहोचलेले उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना भ्रमणध्वनीहून माहिती दिली. त्यानंतर बडनेरा पोलीस निरीक्षक कुळकर्णी यांनी घटनास्थळ गाठून काठेवाडींचा अतिरेक रोखला.ड्रोन कॅमेऱ्यांनी गुरांचा शोधराखीव वनात काठेवाडी गुरे, मेंढ्यांची अवैध चराई होत असताना आता गुरांचा शोध ड्रोन कॅमेºयातून घेतला जाणार आहे. वनविभागाने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला असला तरी शुक्रवारी पळवून नेण्यात आलेली काठेवाडी गुरे कॅमेऱ्यात कैद झाली नाहीत. मात्र, या कारवाईमुळे काठेवाडींमध्ये दहशत निर्माण झाली आहे.पायदळ गस्तीच्या सूचनाराखीव वनात काठेवाडी गुरे, धनगरांच्या मेंढ्यांची अवैध चराई रोखण्यासाठी वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांनी वनरक्षकांना पायी गस्तीच्या सूचना दिल्या आहेत. दरदिवशीचा अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र त्यांनी काढले आहेत.वृक्षलागवडीच्या पाहणीसाठी आलेले उपवनसंरक्षक मिणा यांनी कोंडेश्वरच्या डोंगरावर चराई करणारी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. काठेवाडी पळून जाताच त्यांची गुरेही सुसाट पळाली. वाद झाला नाही.- शरद कुळकर्णी, पोलीस निरीक्षक, बडनेरा.कोंडेश्वर परिसरातील राखीव वनजमिनीवर काठेवाडींची गुरे चराई करीत होते. ही गुरे काठेवाडींनी कोठे पळविली, याचा ‘ड्रोन’ने शोध घेत आहोत. बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.- हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती.