शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

काठेवाडीला अटक; जनावरे ताब्यात

By admin | Updated: July 10, 2014 23:20 IST

काठेवाडी गुरांना राज्यात चराईबंदी या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील वनविभाग सरसावला आहे. त्यानुसार वडाळी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जेवड बीटमध्ये नियमबाह्य गुरांची

कारवाई : गुरांच्या बंदोबस्तासाठी वनविभाग सरसावलाअमरावती: काठेवाडी गुरांना राज्यात चराईबंदी या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील वनविभाग सरसावला आहे. त्यानुसार वडाळी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या जेवड बीटमध्ये नियमबाह्य गुरांची चराई करणाऱ्या एका काठेवाडीला बुधवारी अटक करण्यात आली आहे. गंगाराम ज्वाला भडवाल (४९ रा. रत्नापूर) असे अटक करण्यात आलेल्या काठेवाडीचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, वनजमिनीवर काठेवाडी गुरांच्या चराईला मनाई असताना मागील काही वर्षांपासून काठेवाडी जंगललगतच्या परिसरात गुरांसह ठिय्या मांडून आहेत. काही वनअधिकाऱ्यांना हाताशी धरुन राखीव जंगलात बिनदिक्कतपणे गुरांची चराई करण्याची मोहीम काठेवाडी फत्ते करीत असल्याचे चित्र आहे. मात्र काठेवाडी जनावरांच्या चराईने वनसंपदा नष्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे यांनी कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. वडाळी वनवर्तुळातील नियतक्षेत्र राखीव वनखंड क्र.९ मध्ये काठेवाडी गुरांची चराई होत असल्याच्या माहितीच्या आधारे वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले तेंव्हा अवैधरीत्या ७५ ते १०० काठेवाडी गुरे चराई करीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र वनकर्मचारी आल्याचे बघून काठेवाडींनी ही जनावरे हाकलून लावली. यावेळी वनकर्मचाऱ्यांसोबत काठेवाडींनी वादही केला. अखेर वनकर्मचाऱ्यांनी १५ गुरे ताब्यात घेतले. ही गुरे ताब्यात घेताना वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. यावेळी पाच ते सहा काठेवाडींच्या रोषाला वनकर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. यावेळी काठेवाडींनी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र काठेवाडींची मुस्कटदाबी करण्याचा ध्यास वनविभागाने घेतल्याने राखीव वनक्षेत्रात गुरांची चराई केल्याप्रकरणी गंगाराम भडवाल यांच्याविरुध्द भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१)अ,ड,फ, अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तसेच वनकर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या गाई पळवून नेणे, जीवे मारण्याची धमकी देणे याबाबत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. गुरुवारी आरोपीला न्यायालयात सादर करण्यात आले असता, २४ जुलैपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे. काठेवाडी गुरांच्या चराई बंदीविरुद्ध केलेली कारवाई ही उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे, वनपाल विजय बारब्दे, वनरक्षक अनिस शेख, मनोज ठाकूर, नीलेश करवाळे, एच.एम. आवनकर, एस. आर. पाली, बी.डब्लु. खैरकर, पी.बी. शेंडे, किशोर धोटे, शंकर खंडारे, सुदाम कदम, बले यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. (प्रतिनिधी)