शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

काटकुंभ जि.प. शाळेलाही टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:20 IST

तालुक्यातील काटकुंभ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी आणि मराठी भाषा शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने ...

मेळघाटातील शिक्षणाची लक्तरे : काजलडोहच्या ‘त्या’शिक्षकांवर होणार कारवाई लोकमत न्यूज नेटवर्कचुरणी/चिखलदरा : तालुक्यातील काटकुंभ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी आणि मराठी भाषा शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता टाळे ठोेकल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. शाळेची वेळ उलटून गेल्यावरही शाळेत अनुपुस्थित असलेल्या काजलडोह जि.प.शाळेतील पाचही शिक्षकांवर चौकशी अहवाल येताच कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. मेळघाटात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे विविध घटनांमधून वारंवार सिद्ध होत असते. मात्र, आता उपरोक्त दोन्ही घटनांवरून आदिवासी गावकरी जागृत झाल्याचे दिसते. मंगळवारी सकाळी ११ वाजता काटकुंभ येथील जि.प.हायस्कूलमध्ये इयत्ता नववी आणि दहाव्या इयत्तेसाठी इंग्रजी आणि मराठी विषयासाठी भाषा शिक्षक देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी वारंवार लेखी अर्जाद्वारे केली. मात्र, सतत त्याकडे प्रशासनातर्फे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोेद राठोड, राजेश मालवीय, महेश मालवीय, दिलीप राठोड, पीयूष मालवीय, गुलाब जामुनकर, हरिकिशोर राठोड, राजू राठोड, मधुकर मालवीय यांच्यासह शेकडो संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आणि विद्यार्थ्यांना सुटी दिली. भाषा शिक्षकांची नियुक्ती होेईपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे निवेदन गावकऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटेंसह आ. प्रभुदास भिलावेकर यांना दिले आहे. दोन दिवसांत दोन शाळांना टाळेकाजलडोह येथील जि.प.शाळेतील पाचही शिक्षक सोमवारी दुपारी शाळेची ११ वाजताची वेळ टळून गेल्यानंतर म्हणजे १२.३० वाजता शाळेत पोहोचले. तत्पूर्वी संतप्त गावकऱ्यांसह पंचायत समिती सदस्य, सरपंचांनी शाळेला टाळे लावले होते. मंगळवारी काटकुंभ येथील हायस्कूलला शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी कुलूप ठोकण्यात आले. परिणामी परतवाडा, अमरावतीहून येथे ये-जा करणाऱ्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. चौकशीचे आदेश, कारवाई होणारकाजलडोह येथील शाळेत चक्क दुपारी १२.३० वाजता पोहोचणाऱ्या पाचही शिक्षकांच्या चौकशीचे आदेश मंगळवारी चिखलदरा पंचायत समितीद्वारे केंद्रप्रमुखांना देण्यात आले तसेच चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. काटकुंभ जि.प.हायस्कूलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात विषय शिक्षक देण्यात आले होते. मात्र, गावकऱ्यांना ते मान्य नसल्याने मंगळवारी शाळेला टाळे लावण्यात आले. उशिरा शाळेत पोहोचणाऱ्या काजलडोह येथील पाचही शिक्षकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - गंगाधर मोहने, प्र-गटशिक्षणाधिकारी, पं.स., चिखलदरा