शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कबीर वाणिज्य; आंचल, गौरी विज्ञानात टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:29 IST

बारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार अर्ज करून ७ जूनपर्यंत गुणपडताळणी करता येणार आहे तसेच ७ ते १५ जूनदरम्यान फेरपडताळणी करता येणार आहे. यात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची छायांकित प्रत दिली जाणार आहे.

ठळक मुद्देवाणिज्य शाखेची भरारी : श्रद्धा चांडक, तृष्णा बुरघाटेचमकले; जिल्ह्याचा निकाल ८४.४९ टक्के७ जूनपर्यंत होणार गुणपडताळणी

७ जूनपर्यंत होणार गुणपडताळणीबारावीचा निकाल जाहीर झाला असला तरी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार अर्ज करून ७ जूनपर्यंत गुणपडताळणी करता येणार आहे तसेच ७ ते १५ जूनदरम्यान फेरपडताळणी करता येणार आहे. यात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची छायांकित प्रत दिली जाणार आहे. विषय शिक्षकांकडून छायांकित गुणपत्रिका तपासणीअंती मिळालेल्या गुणांबाबत समाधान नसल्यास शिक्षण बोर्डाकडे विद्यार्थ्याला संपर्क साधता येईल.अमरावती : नियमित कॉलेज, ट्यूशन, सहा तास अभ्यास यामुळेच यश मिळाले आहे. तिला सीए व्हायचे आहे. यानंतर यूपीएससी करायचे असल्याचे अमरावती बोर्डात द्वितीय व वाणिज्य शाखेतदेखील द्वितीय आलेल्या येथील केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची विद्यार्र्थिनी श्रद्धा राजेश चांडक हिने सांगितले.चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा हे तिचे गाव. वडील राजेश चांडक यांचा व्यवसाय आहे. आई शर्मिला गृहिणी आहे. आई वडिलांनी व प्राध्यापकांनी प्रोत्साहन दिले. अभ्यासावर लक्ष दिल्याने यश मिळाले आहे. वाचनासोबत नृत्याची आवड आहे. ध्येय डोळ्यांसमोर ठेवले व त्यासाठी परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते, असे ती म्हणाली.आदिवासी तालुक्याने मारली बाजीइयत्ता बारावीच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी आदिवासीबहुल भाग असलेल्या धारणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ९२.१० टक्के गुण मिळवित शिक्षणात ‘हम किसीसे कम नही’ असे दाखवून दिले. धारणी तालुक्यातील इयत्ता बारावीच्या परीक्षेत १२७९ मुले, ९८९ मुली असे एकूण २२६८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १२७८ मुले तर ९८९ मुली असे एकूण २२६७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. ११७७ मुले आणि ९११ मुली असे एकूण २०८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या मुलांची ९२.१० तर मुलींनी ९२.११ टक्केवारी मिळविली आहे. धारणी तालुक्यातही मुलींनीच निकालात आघाडी घेतली आहे. अमरावती ८४.१५, भातकुली ८०.८६, नांदगाव खंडेश्वर ८६.१४, धामणगाव रेल्वे ८५.५७, चांदूर रेल्वे ८६.०९, तिवसा ७९.६१, मोर्शी ७९.६१, वरूड ८४.४२, चांदूर बाजार ८२.०३, अचलपूर ८५.८५, अंजनगाव सुर्जी ८५.२३, चिखलदरा ८६.३४ आणि धारणी तालुक्यात ९२.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इयत्ता बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी संकेत स्थळावर जाहीर झाला. यात स्थानिक श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या कबीर संजय माखिजा याने ९७.३८ टक्के मिळवून वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात टॉपर येण्याचा बहुमान पटकाविला. याच महाविद्यालयातील श्रद्धा राजेश चांडक ९७.०८, तृष्णा बुरघाटे ९६.९२ टक्के गुण प्राप्त करून अनुक्रमे द्वितीय, तृतीय स्थानी झळकले. यंदा बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेने विज्ञान आणि कला शाखेला गुणवत्तेत धोबीपछाड दिला.शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयातील आंचल मनोहर कश्यप व गौरी अमित गुप्ता या दोघीही समान ९३.५४ टक्के मिळवित विज्ञान शाखेतून अव्वल आल्या आहेत. त्यापाठोपाठ श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा प्रज्वल साळुंके याने ९३.०८ टक्केवारी मिळविली.अमरावती जिल्ह्यात ४०० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यात १५ कनिष्ठ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे विज्ञान शाखेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत फारशी चमक दाखवू शकले नाहीत, हे निकालवरून स्पष्ट होते. कला शाखेतून ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेण्यात कोणताही विद्यार्थी मजल गाठू शकला नाही. मात्र, स्थानिक विद्याभारती महाविद्यालयाचा मोहम्मद सोहेल अहमद सामद हा ९४.४६ टक्के मिळवून महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून अव्वल ठरला.यंदा जिल्ह्यात ३६ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. ३० उत्तीर्ण ९०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विज्ञान शाखेचे ११ हजार ५५६ विद्यार्थी आहेत. गुणवत्ता यादीत ७७१, प्रथम श्रेणी ३४५७, द्वितीय श्रेणीत ६८९५, तर ग्रेड पासिंगमध्ये ४३३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी ९२.८९ आहे.कला शाखेतून ११ हजार ७१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात गुणवत्ता यादीत ४९३, प्रथम श्रेणी ४१६४, द्वितीय श्रेणी ६५३२ तर ग्रेड पासिंग ५२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कला शाखेच्या निकाल ७९.०१ टक्के ठरला.वाणिज्य शाखेतून ३५०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ता यादीत ७६५, प्रथम श्रेणी १३९५, द्वितीय श्रेणी १२३२, तर ग्रेड श्रेणीमध्ये ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.६३ टक्के इतका आहे. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतून ४१२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गुणवत्ता यादीत ६०, प्रथम श्रेणी १८१८, द्वितीय श्रेणी २२३३, तर ग्रेड पासिंग १६ विद्यार्थी झाले आहेत. निकालाची टक्केवारी ७४.७४ इतकी नोंदविली आहे.७९ कॉपीबहाद्दरांवर नियमानुसार कारवाईयंदा बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागातून ७९ कॉपीबहाद्दरांवर कारवाई प्रस्तावित केली होती. त्यानुसार समितीने संबंधित विद्यार्थ्यांचे बयाण नोंदविणे, परीक्षेच्या काळात नेमके काय झाले, याची शहानिशा करण्यात आली. अकोला २०, अमरावती ३०, बुलडाणा २, यवतमाळ १३, तर वाशिम जिल्ह्यात ११ कॉपीबहाद्दर पकडण्यात आले होते. त्यानंतर ७७ कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना दोन परीक्षेतून बाद करण्यात आले आहे, तर दोन कॉपीबहाद्दरांना हिवाळी या एकाच परीक्षेतून बाद ठेवण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. यावेळी विभागीय सचिव अनिल पारधी, जयश्री राऊत उपस्थित होत्या.आंचलला डॉक्टर व्हायचंयअमरावती : ब्रिजलाल बियाणी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील आंचल मनोहरसिंह कश्यप हिने फिशरी विषयात ९३.५४ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान घेतला. तिला भविष्यात डॉक्टर बनून समाजसेवा करायची असल्याचे मत आंचलने व्यक्त केले आहे. आंचलची आई संतोषी गृहिणी, तर वडील बँक अधिकारी आणि भाऊ प्रद्युम्न हा बीईच्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. साईनगर परिसरात राहणाºया आंचलने दररोज चार ते पाच तास अभ्यास केला. पुस्तके वाचणे, पोहणे, चित्रकला असे छंद तिने जोपासले. मन लावून अभ्यास केल्यास यशाचे शिखर गाठता येते, असा संदेश आंचलने दिला आहे. तिचे आवडता नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, आरक्षण मेरिटनुसार असावे, असे तिचे मत आहे. या यशाचे श्रेय तिने आई-वडील व शिक्षक कुशवाह यांना दिले आहे.गौरीला बनायचेय कलेक्टरबालाजी प्लॉट येथे राहणारी गौरी अमित गुप्ता हिने कम्प्यूटर सायन्समध्ये ९३.५४ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून उंच भरारी घेतली आहे. तिला भविष्यात आयएएस दर्जाचा अधिकारी म्हणजेच कलेक्टर व्हायचे आहे. तिचे वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात असून, आई दीपा गृहिणी आहे. लहान बहीण सनीती ही शिक्षण घेत आहे. संयुक्त कुटुंबात राहणाºया गौरीने दररोज पाच ते सहा तास अभ्यास करून हे यश मिळविले. चित्रपट पाहणे, पुरातन नाणी गोळा करण्याचा छंद तिला आहे. आतापर्यंत तिच्याकडे २५० पुरातन नाण्यांचा संग्रह झाला आहे. अभ्यासासाठी तिला शेजारी राहणाºया जोशी यांची मोठी मदत मिळाली आहे. ‘वाचाल तर वाचाल’ यावर तिला विश्वास असून, तसा संदेशही तिने विद्यार्थ्यांना दिला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल