शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘न्याय आपल्या दारी, न्याय सर्वांसाठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:21 IST

महाराष्टÑ राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस पाळणे व त्या अंतर्गत ९ ते १८ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचे दिशानिर्देश दिले होते.

ठळक मुद्देविविध उपक्रमातून संदेश : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे मोटार सायकल रॅली

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिवस पाळणे व त्या अंतर्गत ९ ते १८ नोव्हेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्याचे दिशानिर्देश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक जिल्हा व सत्र न्यायालयस्थित जिल्हा विधिसेवा प्राधिकरणतर्फे विविध उपक्रम राबवित शहरातून गुरुवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.सप्ताहांतर्गत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे, न्यायालयीन परिसरात शासकीय योजनांचे चित्रफितद्वारे प्रसारण, घरोघरी जाऊन विधी सेवा योजनांचा प्रचार व प्रसार असे उपक्रम राबविण्यात आले. 'सर्वांसाठी न्याय योजना व न्याय आपल्या दारी' या बाबींची पूर्तता करण्याच्या उद्देशाने तसेच लोकांना योजनांची माहिती व पात्र लोकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाराष्टÑ राज्य विधी सेवा प्राधिकरणद्वारा निर्गमित उपक्रमांचे आयोजन प्राधिकरणाद्वारे करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव व्ही. के. देशमुख, यांनी हिरवी झेंडी दाखवून जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातून रॅलीस सुरुवात झाली. पुढे गर्ल्स हायस्कूल चौक, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजकमल, हमालपुरा, काँग्रेसनगर, सुंदरलाल चौकमार्गे परत जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात रॅलीची सांगता झाली. रॅलीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अनिल पानसरे, प्राधिकरणाच्या सचिव व्ही. के. देशमुख व अमरावती न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा शासकीय अभियोक्ता परीक्षित गणोरकर व इतर अभियोक्ता वर्ग, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे व अधिवक्ता मंडळी, न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते. प्राधिकरणामार्फत चालविल्या जाणाºया विविध सेवा योजना, समाजातील दुर्बल व गरजू लोकांकरिता उपलब्ध असलेल्या उपक्रमांची माहिती, लोकन्यायालयाचे महत्त्व तसेच ‘न्याय आपल्या दारी व न्यास सर्वांसाठी’ हा संदेश प्रस्तुत रॅलीद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आला.