शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या सात तासांत ‘चेन स्नॅचर्स’ जेरबंद

By admin | Updated: July 12, 2017 00:07 IST

सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन युवकांना सात तासांच्या आत कोतवाली पोलिसांनी शोधून काढले.

कोतवाली पोलिसांची कारवाई : डफरीन रुग्णालय मार्गावरील घटनाअमरावती : सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या दोन युवकांना सात तासांच्या आत कोतवाली पोलिसांनी शोधून काढले. सोमवारी रात्री ११.३०च्या सुमारास जिल्हा स्त्री रूग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. नीलेश ऊर्फ गोलू गजानन दुधरकर (१८,रा.अंबाविहार) व एका अल्पवयीनाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. केवल कॉलनीजवळील अनंत विहार येथील रहिवासी पकंज दिगंबर दखणे हे सोमवारी रात्री काही कामानिमित्त गोपालनगरकडे जात होते. दरम्यान गाडगेनगर उड्डाणपूलावर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव दुचाकीने ओव्हरटेक करून कट मारला. पंकजने त्या दुचाकीस्वाराला हटकले असता त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे पंकजने त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर सदर दुचाकीस्वार पळून गेला. पंकजने त्याचा इर्विन चौकापर्यंत पाठलाग केला. मात्र, तो दिसून आला नाही. त्यामुळे पंकज पुन्हा दुचाकीने गोपालनगरकडे निघाले. इर्विन चौकातून राजापेठ उड्डाणपुलावर चढण्याआधीच पंकजजवळ एक दुचाकी येऊन थांबली. त्यावरील दोन युवकांनी ओव्हरटेक करणारा दुचाकीस्वार डफरीनकडे पळाल्याचे पंकजला सांगितले. पंकज यांनी डफरीनच्या दिशेने दुचाकी वळवली. मागोमाग सदर दुचाकीस्वारही निघाले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पंकजच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. झालेल्या झटापटीत पकंजच्या अंगठ्याला दुखापत सुद्धा झाली. सदर अज्ञात युवक उड्डाणपुलावरून पळून गेली. पंकजने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीचा क्रमांक लिहून घेतला. त्यानंतर पंकजने कोतवाली ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवून चौकशी सुरु केली. पोलिसांनी वेगाने हलविली सूत्रे पंकज दखने यांनी दिलेल्या दुचाकी क्रमाकांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला असता विनोद चिखलकर नावाच्या चार व्यक्तींची नावे पुढे आली. पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी यानावाच्या व्यक्तिंच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्यांचा याघटनेशी संबंध आहे किंवा नाही, याची शहानिशा केली. त्यापैकी तिघांचा या घटनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी सकाळी आरटीओ कार्यालयामार्फत दुचाकी क्रमांक ट्रेस करून पोलिसांनी विनोद चिखलकरचा पत्ता शोधून त्याला अटक केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सात तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आले.