शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

मेळघाटात जंगल सफारी वांध्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 14:26 IST

राज्यात उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांसाठी हल्ली बंद आहेत. त्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी सुरू करण्याच्या आदेशाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

ठळक मुद्देऑफलाईन बूकिंग धोक्याचेकोरोनाचे पर्यटकांवर संकट कायम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १९ जूनपासून जंगल सफारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेळघाटात अन्य पर्यटकांना मनाई असताना, जंगल सफारी कशी सुरू झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प हे पर्यटकांसाठी हल्ली बंद आहेत. त्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी सुरू करण्याच्या आदेशाबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांची स्वाक्षरी असलेल्या आदेशाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह ज्ञानगंगा, काटेपूर्णा, लोणार व टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यही पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचे संकट कायम असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी सुरू झाल्याबाबत पर्यावरणप्रेमी, वन्यजीव संरक्षकांमध्ये कमालीचा रोष पाहावयास मिळत आहे. तसेही पावसाळा सुरू असताना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी बंद असते. राज्य शासनाने पर्यटनस्थळे, व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये सुरू करण्याबाबत कोणतेही गाइड लाइन जारी केले नाही. असे असताना कशाच्या आधारे रेड्डी यांनी मेळघाटात जंगल सफारी सुरू केली, हा मोठा गंभीर विषय पुढे आला आहे.

केवळ जंगल सफारीला मान्यता देण्यात आली असून, पर्यटकांसाठी हॉटेल, रेस्टारंट बंद आहेत. मेळघाटात जंगल सफारी सुरू करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेण्यात आली नाही, असा आक्षेपदेखील पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. राज्यात जंगल सफारीचे बूकिंग ऑनलाईन असताना मेळघाटात ऑफलाईन का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे जंगल सफारी येत्या काळात वांध्यात तर येणार नाही, असे बोलले जात आहे.

व्याघ्र प्रक ल्प संवर्धन आणि मॅनेजमेंट प्लॅनमध्ये पर्यटनाबाबत काही बाबी स्पष्टपणे नमूद आहेत. त्यामुळे जंगल सफारी सुरू करताना वेगळे आदेश काढण्याची गरज नाही. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अहवालानुसार पर्यटन सुरू करण्यात आले.- नितीन काकोडकर,प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर.

चिखलदऱ्यात जंगल सफारीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पर्यटकांना प्रवेश नाही. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यापूर्वी नाक्यावर वनकर्मचारी तैनात आहेत. पर्यटकांची तपासणी करूनच वाहने सोडले जाते. हॉटेल, रेस्टारंट बंद असून, पर्यटकांनासाठी निवासाची व्यवस्था नाही.- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, चिखलदरा.

 

 

टॅग्स :Melghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्पTigerवाघ