शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

१० जूनला ‘हा’ ग्रह येणार पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:50 IST

सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरू ग्रह १० जून रोजी अगदी सूर्यासमोर येणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात.

ठळक मुद्देगतवर्षी ९ मे रोजी प्रतियुती गॅलिलिओ यानद्वारे गुरूची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरू ग्रह १० जून रोजी अगदी सूर्यासमोर येणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. गुरू-सूर्य आमने-सामने येण्याच्या कालावधीतील अंतर पृथ्वीपासून सर्वात कमी असते. त्यामुळे खगोल अभ्यासकांना व जिज्ञासूंना गुरू ग्रहाचे निरीक्षण व अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.गुरूच्या लागोपाठ प्रतियुतीमधील हा काळ साधारणत: १३ महिन्यांचा असतो. यापूर्वी ९ मे २०१८ रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झाली होती. त्या दिवशी पृथ्वीपासून गुरूचे अंतर ९३ कोटी किमी होते. गुरूचा व्यास १,४२,८०० किमी. आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरुला एकूण ७९ चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता, पट्टा व चार चंद्र दिसतात. ७ डिसेंबर १९९५ रोजी मानवरहित यान गॅलिलिओ हे गुरूवर पोहचले. गुरूवर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.पृथ्वीपेक्षा गुरू ग्रह ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे एक गुरूचे खास वैशिष्ट्य आहे. 'ग्रेट रेड स्पॉट' या नावाने हा ठिपका ओळखला जातो. त्याची लांबी ४० हजार किमी लांब आणि १४ हजार किमी रुंदीचा अवाढव्य आकाराचा आहे. या ठिपक्यात पृथ्वीसारखे तीन ग्रह एका पुढे एक सामावतील. १० जून रोजी सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने तो सहज ओळखता येईल व साध्या डोळ्यांनी पाहता येईल. परंतु, गुरूवरचा ग्रेट रेड स्पॉट व युरोप, गॅनिमिड, आयो व कॅलेस्टो हे गुरूचे चार चंद्र साध्या डोळ्यांनी दिसू शकणार नाहीत. त्यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता भासणार असल्याचे खगोल हौशी अभ्यासक विजय गिरुळकर, प्रवीण गुल्हाने यांनी सांगितले.

टॅग्स :scienceविज्ञान