शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

४ जुलै रोजी पृथ्वी सूर्यापासून सर्वाधिक दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 12:05 IST

Amravati News ४ जुलै रोजी पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १५२ दशलक्ष कि.मी. राहील. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते. या दिवसात दरवर्षाला फरक पडू शकते.

ठळक मुद्देपृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १५ कोटी किमीसूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सरासरी दर वर्षाला ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सर्वाधिक असते. या घटनेला खगोल शास्त्रात अेपीहेलिऑन (अपसूर्य) असे म्हणतात. पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १५ कोटी कि.मी. आहे. या अंतराला खगोल शास्त्रात एक खगोलीय एकक असे म्हणतात. ४ जुलै रोजी पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १५२ दशलक्ष कि.मी. राहील. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते. या दिवसात दरवर्षाला फरक पडू शकते.

सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून, यात हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र चालू असते. सूर्याच्या केंद्रात एक सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलीयम बनते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तुमानाचे रुपांतर सौर उर्जेत होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते, त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागाचा शोध १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होतो. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमिटर ओढली जात आहे. ५ खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. त्यामुळे न्यूयार्क शहर हे लंडनपासून दरवर्षाला २.५ सें.मी.दूर जात आहे. ४ जुलै रोजी पृथ्वी-सूर्य हे अंतर अधिक असल्याने या खगोलीय घटनेचा संपूर्ण सजीव सृष्टीवर कोणताही वाईट परिमाण होणार नाही. पंरतु सूर्याकडे सरळ साध्या डोळ्याने पाहणे धोक्याचे ठरेल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे

सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर ऑर्थर एडींग्टन यांनी सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. यापैकी ५ अब्ज वर्षे संपले असून ५ अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू श्वेत बटू ताऱ्यामध्ये होईल. सूर्यावरून कधीकधी चुंबकीय लहरी फेकल्या जातात. त्यामुळे चुंबकीय वादळे येतात. १८५९ मध्ये हे वादळ आले होते. त्यामुळे जगातील टेलीग्रॉफ यंत्रणा बंद पडली होती या वादळाला केरीग्टन इव्हेंट हे नाव दिले होते. अशा वादळामुळे सॅटेलाईट, जी.पी.एस.यंत्रणा पूर्णपणे बंद पडतात.

--------------

टॅग्स :Earthपृथ्वी