शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता कंत्राटदारांना २० जुलैची डेडलाइन, अन्यथा 'ब्लॅकलिस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:30 IST

महापालिका उपायुक्त : कामकाज सांभाळताच नोटीस, कंत्राट रद्द करण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात दैनंदिन स्वच्छतेची कामे करारनाम्यानुसार होत नसल्याने प्रभागामध्ये अस्वच्छता कायम आहे. नाल्याची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून आपण आपल्या कामामध्ये २० जुलैपर्यंत योग्य सुधारणा करणे बंधनकारक आहे, अशी नोटीस महापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी मंगळवारी पाचही प्रभागातील कंत्राटदार संस्थेच्या अध्यक्ष, सचिवांना बजावली आहे.

साफसफाई होत नसल्यामुळे साथरोग, कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे निरीक्षणदेखील त्यांनी नोंदविले आहे. उपायुक्त प्रशासन म्हणून जबाबदारी येताच मडावी यांनी सोमवारी दुपारी स्वच्छता विभाग प्रमुखांसह अधीक्षक व निरीक्षकांची बैठक घेत स्वच्छता विभागाचा आढावा घेतला. तर मंगळवारी भर पावसात शहरातील विविध भागांची पाहणी केली. त्या पाहणीदरम्यान नोंदविलेल्या निरीक्षणाअंती त्यांनी मंगळवारी सायंकाळी पाचही झोनमधील स्वच्छता कंत्राटदारांना नोटीस बजावली. नोटीसमधील नऊ मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही करावी. ती न झाल्यास आपले कंत्राट रद्द करून आपल्या संस्थेस काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

ट्रॅक्टरने करा फवारणीप्रभागामध्ये डास निर्मूलन मोहिमेकरिता कामगार अपुरे पडत असल्यामुळे प्रत्येक झोननिहाय पाण्याच्या टाकीसह एक नवीन ट्रॅक्टर कंत्राटदाराने खरेदी करावा व त्याद्वारे जंतुनाशक फवारणी करावी. दैनंदिन साफसफाई करण्याकरिता लावण्यात आलेल्या कामगारांना गणवेश, ओळखपत्र तसेच स्वयं सुरक्षा साहित्य किट त्वरित पुरवठा करावी व ते वापरण्यास कामगारांना बंधनकारक करावे.

१०० कामगार लावादैनंदिन साफसफाईकरिता झोननिहाय प्रत्येक प्रभागामध्ये १०० कामगार लावावेत. त्यांच्याकडून दैनंदिन साफसफाई, नाल्या काढणे, घराघरातून कचरा संकलित करण्यासह डास निर्मूलन मोहीम राबवावी. प्रभागातील सर्वत्र पडलेला कचरा त्वरित उचलून घ्यावा. प्रभागातील सर्व नाल्या बॉटमपासून साफ करण्यात याव्यात. प्रभागामध्ये जागोजागी पडलेल्या कचऱ्यावर तसेच नाल्यातील गाळ काढण्यात आलेल्या मलम्यावर जंतुनाशक फवारणी करण्यात यावी.

जीपीएस फोटो दररोज बंधनकारककामगारांची हजेरी जीपीएस फोटोने न घेतल्यास • देयक अदा करण्यात येणार नाही. प्रत्येक घरी घंटागाडीद्वारे १०० टक्के कचरा संकलन आवश्यक आहे. कामगारांची हजेरी सकाळी सहा ते ६:३० वाजेपर्यंत घेण्यात यावी. सकाळी हजेरीच्या ठिकाणी जास्त वेळ न थांबवता त्यांची हजेरी रजिस्टरमध्ये नोंद घेऊन त्यांना त्वरित कामावर पाठविण्यात यावे, असे निर्देश दिले. 

टॅग्स :Amravatiअमरावती