शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

खरीप उद्ध्वस्त संयुक्त सर्वेक्षण, पंचनाम्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:41 IST

यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. सोयाबीनलादेखील मोड आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता कापूस वेचणीचा व सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम असताना १८ ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे.

ठळक मुद्देदहा दिवसांपासून अवकाळी : १.४५ लाख हेक्टरमधील पिके बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे १ लाख ४५ हजार ५३ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे १ लाख ४७ हजार ९१९ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले.यंदाच्या हंगामात पेरणीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड राहिल्याने मूग, उडीद आदी अल्पावधीची पिके उद्ध्वस्त झालीत. सोयाबीनलादेखील मोड आली. यामधून शेतकरी सावरत नाही तोच संततधार पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता कापूस वेचणीचा व सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम असताना १८ ऑक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे हे सोयाबीन जागेवरच थिजले. ज्यांनी सोंगणी केली, त्यांनी लावलेल्या गंजीमधील शेंगांना अंकुर फुटत आहेत. हीच स्थिती ज्वारीची आहे. कणसामधील दाण्यांचे बीजांकुरण होत आहे. कणसे काळी पडली आहेत. कापसाची बोंडे सडायला लागली आहेत, तर फुटलेल्या बोंडामधील कापूस ओला झाल्याने प्रथवारी खराब झालेली आहे. कापूस सडायला लागला आहे. यामधील सरकीलाच कोंब फुटायला लागले असल्याचे विदारक चित्र शेतशिवारात आहे.जिल्हा कृषी विभागाद्वारे प्राथमिक नजरअंदाज अहवाल २९ ऑक्टोबरला जिल्हाधिकाºयांना सादर झाला. यामध्ये जिल्ह्यातील १६०६ गावांमध्ये सोयाबीन ९५ हजार ८९९ हेक्टर, कापूस ४१ हजार, ज्वारी ३१६३ हेक्टर, धान ३४६९ हेक्टर, तूर ७२० हेक्टर व १८३ हेक्टरमधील मका पिकाचे मोठे नुकसान या पावसाने झालेले आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ४५ हजार ५३ हेक्टरमधील खरीप पिकांना फटका बसलेला आहे. किमान १ लाख ४७ हजार ९२९ शेतकरी या अकाली संकटामुळे बाधित झालेले आहेत.३३ टक्क्यांवर नुकसानाचे सर्वेक्षणदहा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत. या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. ग्रामसेवक, कृषिसहायक व तलाठी संयुक्त सर्वेक्षण व पंचनामे करून अहवाल सादर करणार आहेत. ज्या ठिकाणी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, अशा ठिकाणी संयुक्त सर्वेक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार कापणी केलेल्या, जमा करून ठेवलेल्या, कापणीस आलेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून संयुक्त स्वाक्षरीसह तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.७२ तासांच्या आत करा अर्जजिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी काढणीच्या अवस्थेत आहेत. कपाशीची बोंडे परिपक्व झाल्याने फुटू लागली आहेत. ती आता सडायला लागली आहेत. कापून सुकत ठेवलेले सोयाबीनदेखील ओले झाले आहे. पावसाने अवेळी हे नुकसान झाले आहे. पीक विमा क्षेत्र जलमय होणे व कापणी केलेल्या पिकांचे काढणीपश्चात नुकसान या बाबींसाठी वैयक्तिक पंचनामे करुन विमादारक शेतकºयांना भरपाई देण्याची तरतूद आहे. त्यासाठी पिक नुकसानीचा सुचना फार्म भरुन लगतच्या कृषी कार्यालयाकडे देणे महत्वाचे आहे.टोल फ्री क्रमांकावर द्यावी माहितीपिकांच्या नुकसानाची माहिती १८००११६५१५ या टोल फ्री क्रमांकावर देणे आवश्यक आहे. पावसामुळे शेती जलमय होऊन उभ्या पिकांचे किंवा कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले असल्यास ७/१२ व विमा हप्ता भरल्याच्या पुराव्यासह विमा कंपनी, तालुका, जिल्हा कार्यालय, विमा हप्ता भरलेली बँक, महसूल वा कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाºयांकडे कळविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी