जिल्हा काँग्रेसची बैठक : माजी मंत्री सुबोध मोहिते यांचे आवाहन अमरावती : येणाऱ्या जि. प., पं. स., न. पा. निवडणुकीत काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत असून नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सर्कल, तालुकानिहाय मास्टर प्लॉन तयार करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे, त्याकरिता सर्वांनी एकजुटीने पक्ष संघटन मजबूत करावे. उमेदवारा७ची योग्यता तपासून उमेदवारी द्यावी व विजयाकरिता सर्वांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन जिल्हा पक्ष निरीक्षक माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी केले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी माजी मंत्री सुबोध मोहिते (पक्ष निरीक्षक) बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, संजय बोडखे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, ग्रामीण यांची सभा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला अमरावती जिल्हा ग्रामीण पक्ष निरीक्षक माजी मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार बंडू सावरबांधे, शेखर शेंडे, संजय बोडखे, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर उपस्थित होत्या.पुढे बोलताना माजी आमदार बंडू सावरबांधे यांनी काँग्रेसच्या काळातील सरकारांनी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि गोरगरिबांना मदतीचा हात दिला. अतिवृष्टीची मदत, खरळचे नुकसान, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण या बिजेपी सरकारने शेतकऱ्याला मदत न करता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू केले आहे. आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या सरकारविरुद्ध लढा देऊन जनतेसमक्ष यांचे खोटे कारणामे उघड करावे. वाढती महागाई, कापूस, धान, ज्वारी, सोयाबीन यांचे भाव कमी केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे त्यामुळे सरकारला काँग्रेसने धारेवर धरून जनतेला बिजेपी सरकारचा अच्छे दिन (बुरे दिन) अवगत करावे, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.यावेळी आ. यशोमती ठाकूर यांनी केंद्र व राज्य सरकार यांचे खोटे आश्वासने व शासकीय योजनाचे नावे बदलून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडा व एकजुटीने कार्य करा असे सांगितले. आ. वीरेंद्र जगताप यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्ला चढवीत बिजेपी शासनाचे खोटे आश्वासन जनतेसमोर ठेवण्याचे कार्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. यावेळी सभेला माजी आमदार सुलभा खोडके यांनी मार्गदर्शन केले. सभेकरिता माजी महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा पुष्पा बोंडे, संजय खोडके, किशोर बोरकर, माजी आ. केवलराम काळे, माजी आ. नरेशचंद्र ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, गिरीश कराळे, महेंद्र गैरवार, वनमाला खडके, प्रल्हाद ठाकरे, छाया दंडाळे, विद्या देडू, संजय वानखडे, प्रकाश काळबांडे, सुधाकर भारसाकळे, राजाभाऊ टवलारकर, रेखाताई पटेल, संजय लायदे, अनंत साबळे, दयाराम काळे, संजय तट्टे, भागवतराव खांडे, संजय मापले, प्रदीप कांबळे, बापूराव गायकवाड, प्रदीप देशमुख यशवंत मंगरोळे, अमोल जाधव, गणेशराव आरेकर, हरिश्चंद्र मुगल, मनोज जयस्वाल, श्रीकांत जोडपे, एजाजखान, सुनील गावंडे, प्रमोद टाकरखेडे, सुरेश आडे, दिवाकर देशमुख, कैलास आवारे, प्रकाश पुसदेकर आदींची उपस्थिती होती.स्थानिक स्वराज संस्थेची जाणून घेतली वस्तुस्थितीसभेमध्ये जिल्ह्यातील १४ ही तालुक्यांतील समस्या पक्षसंघटन, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्ष बलाबल याविषयी माहिती तालुकाध्यक्ष यांच्याकडून जाणून घेण्यात आली. महापालिका, जि.प., नगरपंचायत, ग्रामपंचायत आदिवर काँग्रेसचे अधिराज्य असल्याचे स्पष्ट झाले. यशोमती ठाकूर यांच्यावरील हल्ल्याचा निषेधयावेळी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर शनिवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध काँग्रेस कमिटीतर्फे घेण्यात आला. हल्लेखोरांवर कारवाई किंवा गुन्हे दाखल न केल्यास जिल्हा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला.
काँग्रेस पक्षासाठी एकजूट व्हा !
By admin | Updated: June 27, 2016 00:03 IST