‘लोकमत’तर्फे उपक्रम : आरोग्यविषयक जागरूकतेसाठी शिबिर अमरावती : सुदृढ बाळांचे कौतुक करण्यासाठी 'लोकमत'तर्फे ‘जॉन्सन बेबी’ व इंडियन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स अमरावती शाखेच्या सहकार्याने 'सुदृढ बालक' स्पर्धेचे २४ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे. बाळाच्या आरोग्य आणि पालन-पोषणासंदर्भात जागरुकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.गुटगुटीत बाळाच्या चेहऱ्यावरच्या हास्यापेक्षा आई-वडिलांना अधिक मौल्यवान काय असू शकते? परंतु त्या नाजूक जीवाची काळजी घेणे म्हणजे फार जिकरीचे काम असते. एका शतकापासून 'जॉन्सन बेबी'ची विविध उत्पादने लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मातांची आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पहिली पसंती राहिली आहे. वैद्यकीय परीक्षणातून सिद्ध झालेल्या 'जॉन्सन बेबी'ची सर्व उत्पादने बाळाच्या अत्यंत नाजूक त्वचेला सहन होतील, अशीच तयार केली जातात. बाळांचे डोळे, त्वचा आणि केस यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देऊन 'सुरक्षित, सौम्य आणि परिणामकारक' अशा तिहेरी लाभयुक्त उत्पादने पालकांचा विश्वास टिकवून आहेत. बाळाला सर्व संकटांतून वाचविण्याचे वचन दिलेले असते. या वचनपूर्ततेसाठी 'जॉन्सन' सर्वश्रेष्ठ उत्पादनांसह सदैव तत्पर आहे.इंडियन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स ही मुलांच्या आरोग्य विकासासाठी कार्य करणारी संस्था आहे. 'लोकमत सुदृढ बालक' स्पर्धेत पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयएपीचे अध्यक्ष डॉ.ऋषिकेश नागलकर, सचिव डॉ. नीलेश पाचबुध्दे, डॉ.नरेश तायडे यांनी केले. एकूण तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. अ गट - ० ते १ वर्ष, ब गट - १ ते ३ वर्षे, क गट - ३ ते ५ वर्षे असे तीन गट तयार करण्यात आले आहेत. सर्व स्पर्धकांनी बाळाचा जन्मदाखला, वयाचा पुरावा आणि वैद्यकीय उपचार व लसीकरणाची कागदपत्रे नाव नोंदणी करतेवेळी सादर करणे गरजेचे आहे. शुक्रवार, २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर सभागृह, मोर्शी रोड, अमरावती येथे ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड अमरावती या ठिकाणी नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ९८५०३०४०८७, ८९५६५४४४४८ या नंबरवर संपर्क साधावा. नावनोंदणी स्पर्धेच्या दिवशी होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर या स्पर्धेसाठी नावनोंदणी करावी.
जॉन्सन प्रस्तुत सुदृढ बालक स्पर्धा शुक्रवारी
By admin | Updated: July 23, 2015 00:10 IST