शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जीप जात नाही, ट्रक गेला कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 23:55 IST

पालकमंत्र्यांच्या उलटतपासणीने ठाणेदार घामाघूम : एसपीची कानउघाडणी, दोन तासात मागविला सीडीआर

पालकमंत्र्यांच्या उलटतपासणीने ठाणेदार घामाघूम : एसपीची कानउघाडणी, दोन तासात मागविला सीडीआरअमरावती : माझा ताफाच काय, तर साधी जीप या ठिकाणावरून जाण्यास अडथळा होत असतांना दहाचाकी ट्रक शहरात दाखल झालाच कसा? अशा सवाल पालकमंत्र्यांनी केला. त्यावर चांदूरबाजारचे ठाणेदार घामाघूम झालेत. पालकमंत्र्यांच्या आक्रमकतेसमोर ठाणेदारांची बोबडी वळली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी थेट ठाणेदाराच्या ‘कॉलडिटेल्स’ एसपींकडून मागवल्याने पोलिस यंत्रणा हादरुन गेली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी दुपारी चांदूरबाजार गाठून अपघातात बळी पडलेल्या इंगळे कुटूंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांचा ताफा चांदूरबाजारातील मुख्य चौकात पोहोचला. पालकमंत्रीच चौकात आल्याने स्थानिक पोलिसांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी आॅटो व अन्य वाहनांना रस्त्याच्या बाजूला केले. त्याचवेळी पालकमंत्री वाहनाबाहेर पडले व कुठल्याच वाहनांना न हटवता ज्या वाहनांना हटविले त्यांना पुन्हा तेथेच लावण्याच्या सूचना दिल्या. ठाणेदार अजय आखरे यांना पालकमंत्र्यांनी बोलावून घेतले. वर्दळीच्या या ठिकाणावरुन माझ्या ताफ्यातील वाहने सुरक्षितपणे कुणालाही न हटवता जाणे शक्यच नाही, तर गायींची अवैध वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक पुढे पोहचलाच कसा? असा सवाल पालकमंत्र्यांनी आखरेंना विचारला. पालकमंत्री संतापाने लालबुंद झाले असतांना ठाणेदार व त्यांची यंत्रणा गपगार झाली होती. ज्या मार्गाने तो ट्रक शहरात दाखल झाला त्या सर्व मार्गांची पालकमंत्र्यांनी पाहणी केली व अपघात कसा घडला असावा, याचे प्रात्यक्षिकच केले. (प्रतिनिधी)ठाणेदाराचे कॉल डिटेल्स मागविले ज्या वर्दळीच्या ठिकाणावरुन गुरांची वाहतूक करणारा तो ट्रक पुढे खरवाडीला गेला त्या सर्व रस्त्यांची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री चांदूरबाजार ठाण्यात पोहोचले. ज्या-ज्या वेळी गुरांची अवैध वाहतूक करणारे ट्रक शहराच्या विशिष्ठ भागातून जातात. त्यावेळी पोलिसांकडून तो मार्ग मोकळा केल्या जातो, असा आरोप नागरिकांनी केला. त्या आधारे पालकमंत्र्यांनी ठाणेदार अजय आखरे यांचे मागील दोन महिन्यांचे कॉल डिटेल्स दोन तासात देण्याचे आदेश एसपींना दिलेत.एफआयआरची तपासणी २० जुलैला गुरांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रकने इंगळे कुटूंबातील तिघांचा बळी घेतला. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी शनिवारी या गुन्ह्यातील एफआयआरची तपासणी केली. तो ट्रक जात असतांना चालकाने ठाणेदारांंशी संपर्क साधला का?हे तपासण्यासाठी थेट ठाणेदारांचेच कॉलडिटेल्स मागविल्याने यंत्रणेची बोलतीच बंद झाली होती. अजय आखरे यांच्यासह महसूल यंत्रणेलाही पालकमंत्र्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. इंगळे कुटुंबीयांचे सांत्वन बेधुंद ट्रक चालकाने खरवाडीनजिक इंगळे यांच्या चार चाकी वाहनाला धडक दिली. या अपघातात किशोर-शिल्पा या दाम्पत्यासह चिमुकल्या शौर्य इंगळेचा करुण अंत झाला. पालकमंत्र्यांनी शनिवारी त्यांचे घर गाठून शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास दिला. तथा किशोर इंगळे यांच्या वृद्ध आईचे व चिमुकल्या सुजलचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी खरवाडी येथे घटनास्थळाची पाहणी करुन अपघाताची नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली. पालकमंत्र्यांनी चांदूरबाजारच्या ठाणेदाराचे कॉलडिटेल्स रिपोर्ट मागविला आहे. तथापि सोमवारी सीडीआर देणे शक्य होईल. कॉल डिटेल्स चौकशीचाच एक भाग आहे. - लखमी गौतम, पोलिस अधीक्षक