शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जावईबापूंचा पहिला दसरा पाच हजारांत, सोने पोहोचले 49 हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 05:01 IST

दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. पण, जावईबापूंचा पहिलाच दसरा असेल, तर खऱ्याखुऱ्या सोन्याचे पानदेखील देण्याची प्रथा आहे. गतवर्षी मार्चपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली, सामान्यांसह व्यावसायिकांना हतबल करून सोडणारी स्थिती आता नाही. जनजीवन, व्यापार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. त्याचा सकारात्मक परिमाण सराफा बाजारावरील ग्राहकीवर झाला आहे.

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, जीडीपीवर होणारा परिणाम आणि आर्थिक अनिश्चितता हे घटक पुन्हा एकदा सोन्याच्या दरवाढीस पोषक वातावरण निर्माण करणारे ठरले आहे. दोन महिन्यात सोन्याचा भाव चार हजारांनी वाढला. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचा दर प्रतितोळा ४९ हजारांवर गेला. चांदी प्रतिकिलो ६२ हजार रुपयांपर्यंत पोहोचली. दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. पण, जावईबापूंचा पहिलाच दसरा असेल, तर खऱ्याखुऱ्या सोन्याचे पानदेखील देण्याची प्रथा आहे. गतवर्षी मार्चपासून उद्भवलेल्या कोरोनामुळे हाताबाहेर गेलेली, सामान्यांसह व्यावसायिकांना हतबल करून सोडणारी स्थिती आता नाही. जनजीवन, व्यापार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. त्याचा सकारात्मक परिमाण सराफा बाजारावरील ग्राहकीवर झाला आहे.

अर्ध्या ग्रॅमचे पान २५००, एक ग्रॅम पान पाच हजारातसराफा बाजारात अर्ध्या ग्रॅमच्या सोन्याच्या पानासाठी २५०० रुपये, तर एक ग्रॅमच्या सोन्याच्या पानासाठी सुमारे ४८०० ते पाच हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र, हौसेला व मानपानाला मोल नसल्याने या सुवर्णपानांची खरेदीदेखील जोरात सुरू आहे.

सराफा व्यापारी काय म्हणतात...

सोने बाजार सकारात्मक व समाधानकारक आहे. ग्राहकीदेखील चांगली आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ४८ हजारांच्या घरात आहे.- महेश वर्मा, माधुरी ज्वेलर्स

२४ कॅरेट सोन्याचा दर ४९,४७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर तोळ्याला ४५,७९० रुपये असा आहे. ग्राहकी उत्तम आहे. बाजारात रौनक आहे.- पी.एन.गाडगीळ ॲन्ड सन्स

सोने बाजारात धूम दोन महिन्यांपासून शहर संपूर्णत: अनलॉक झाले. जनजीवन पूर्वपदावर आले. व्यवसायदेखील पूर्ण जोमाने सुरू झाले आहेत. लागोपाठच्या लॉकडाऊनमुळे अनेकांना सोने खरेदीची हौस पूर्ण झाली नाही. विवाहाच्या वेळीदेखील अनेकांना लपून-छपून सोने खरेदी करावे लागले. आता मात्र सराफा बाजार पूर्ण क्षमतेने फुलला आहे. दसरा व दिवाळीच्या शुभपर्वावर सराफा झळाळला आहे.

 

टॅग्स :Goldसोनं