अमरावती : जळगाव भागात उत्पादित होणारे खरबुज अमरावतीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. उन्हाळ्यात हल्ली खरबुजाला ग्राहकांची पसंती आहे. प्रति किलो २५ ते ३० रुपये दराने विक्री होत आहे.
-------------------------
जुनीवस्तीत रस्ते निर्मिती
अमरावती : बडनेराच्या जुनीवस्तीतील सावता मैदान ते टी-पॉईंट दरम्यान सिमेंट रस्ते चौपदीकरणाची कामे वेगाने सुरू आहे. त्यामुळे अमरावती-बडनेरा मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. जुनीवस्तीला बहुतांश वेळा ट्रॉफिक जाम ही नित्याचीच बाब झाली आहे.
----------------------
कारागृह भिंतीलगत संरक्षण कुंपण नाही
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीलगत चांदूर रेल्वे मार्गाच्या बाजूने संरक्षण कुंपणाचा अभाव आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक खुल्या जागेवर कचरा, घाण आणून टाकत असल्याचे वास्तव आहे. संरक्षण कुंपणाअभावी सागवान वृक्ष व अन्य झाडांची चोरीदेखील होत आहे.
---------------------------------
ऑक्सिजन पार्कसमोर कचरा डेपो
अमरावती : येथील जुने बायपासलगतच्या ऑक्सिजन पार्कसमोरील भागात मिनी कचरा डेपो तयार करण्यात आला आहे. महापालिका सफाई कर्मचारी परिसरातून गोळा झालेला कचरा याच भागात आणून टाकतात. त्यामुळे ऑक्सिजन पार्कसमोर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
-------------------------------
विश्रामगृह ते नवीन बायपास रस्ता नादुरुस्त
अमरावती : बडनेराच्या नवीवस्तीतील विश्रामगृह ते नवीन बायपास वळण रस्ता वर्षभरातच उखडला. या रस्त्याच्या निर्मितीसाठी डांबर वापरले की नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे हे संबंधित अभियंत्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावणारे आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे.