शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताच्या अवैध साठवणुकीचे जळगाव कनेक्शन उघड, अमरावती पोलिसांची संयुक्त कार्यवाही

By प्रदीप भाकरे | Updated: August 21, 2023 17:26 IST

पथक जबलपूर अन् धुळ्याला

अमरावती : माहुली जहांगिर ते सालोरा खुर्द मार्गावरील अनंत वाढोकर याच्या शेतातील गोडावूनमधून पोलिसांनी सुमारे २.३९ कोटी रुपयांचा रासायनिक खतांचा साठा व ट्रक व अन्य साहित्य जप्त केले होते. १९ ऑगस्ट रोजी झालेल्या त्या कारवाईदरम्यान माहुली पोलिसांनी दोन चालकांसह स्थानिक गोडाऊन किपर व शेतमालकाला अटक केली. उर्वरित आरोपींच्या शोधार्थ ग्रामीण पोलिसांचे पथक जळगाव जिल्ह्यात गेले असता, तेथील एका गावातील सेवा सहकारी सोसायटीच्या गोडाऊनमधून अमरावती पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी जळगाव पोलीस व कृषी विभागाच्या सहाय्याने रासायनिक खतांचा मोठा साठा जप्त केला. त्यामुळे रासायनिक खतांच्या अवैध साठवणुकीचे जळगाव कनेक्शन उघड झाले आहे.

तत्पुर्वी, माहुली जहांगिर पोलिसांच्या पंचनाम्यानुसार तेथील गोडाऊनमधून हैद्राबाद, मंडला, जबलपूर येथील कंपनीचे २५ किलो व ४० किलोच्या पॅकींगमधील महाराष्ट्रात विक्री करीता प्रतिबंधीत असलेला खत साठा गोडावून व दोन ट्रकमधून जप्त करण्यात आला होता. त्याप्रकरणी, चाैघांना अटक केल्यानंतर प्रकरणाचे पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी २० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन पोलीस पथके जबलपूर, जळगाव व धुळे येथे पाठविली आहेत. त्यातील जळगावला गेलेल्या पोलीस निरिक्षक सुनिल साळुंखे यांच्या नेतृत्वातील पथकाच्या हाती तेथे खतांचा मोठा साठा हाती आला आहे. तर मध्यप्रदेशातील जबलपूर येथे देखील स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणच्या गोडाऊनची झाडाझडती अमरावती पोलिसांनी चालविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFertilizerखतेAmravatiअमरावतीAgriculture Sectorशेती क्षेत्र