लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोग मान्य करीत नसल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने ३० एप्रिल रोजी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जेल भरो आंदोलन केले.भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम वापराचा अट्टहास करून पारदर्शक निवडणूक घेतल्या नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. देशभरात ईव्हीएम विरोधात असंतोष वाढत असून, अनेक ठिकाणी या मशीन फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ ला भयमुक्त वातावरणात पारदर्शक निवडणूक होण्याकरिता पेपर ट्रेल मशीन लावण्याचे आदेश दिले. २०१४ च्या निवडणुकीत आयोगाने १०० टक्के पेपर ट्रेल न लावता निवडणूक घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यावेळी देशभरात केवळ ०.३३ टक्के ईव्हीएम सोबत पेपर ट्रेन लावण्यात आले होते. परंतु मतदारांनी पासून ही माहिती लपवण्यात आली नागरिकांच्या मौलिक अधिकारांचे उल्लंघन करणे हा अपराध असून हे काम निवडणूक आयोगाने केल्याचा आरोप बहूजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी केला. यावेळी करण्यात आला.सध्याची निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, अशी बहुजन क्रांती मोर्चाची मागणी आहे.जेलभरो आंदोलन करणाऱ्या शंभर कार्यकर्त्यांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी त्यांची सुटका केली. या आंदोलनात सुनील डोंगरदिवे, सिद्धार्थ गायकवाड, पंचशीला मोहोड, प्रफुल्ल गवई, संजय ठाकरे, गुलाब उमाळे, गजानन दोड, रवि जाधव, संतोष खराते, गजानन धामणे, अब्दुल्ला खान, मौलवी मुजम्मील, धनराज वाघ, प्रदीप बनसोड, अखिल किनाके, प्रवीण आत्राम, अंकेश इंगोले, मनोज रंगारी, आनंद वानखडे, प्रशांत रंगारी, आकाश राऊत, सुनील गवई, अमन काळे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
ईव्हीएम विरोधात जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:20 IST
ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोग मान्य करीत नसल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने ३० एप्रिल रोजी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जेल भरो आंदोलन केले.
ईव्हीएम विरोधात जेलभरो
ठळक मुद्देलक्षवेध : बहुजन क्रांती मोर्चा रस्त्यावर