शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

विकासकामे रोखल्यास खैर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 05:00 IST

राजापेठ उड्डाणपूल निर्मितीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. दाेन वर्षांचे पाच वर्षे झाली असतानाही उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. छत्री तलाव व बेलपुऱ्याकडे जाणाऱ्या मार्गाचे बांधकाम रखडल्याने आमदार राणा प्रचंड संतापले. कुणाच्या पत्राने हे थांबविले, ते पत्र मला द्या, असा सवाल त्यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांना केला. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली.

ठळक मुद्देरवि राणा संतापले, राजापेठ उड्डाणपूल अप्रोच रस्त्यावर खल, ‘फिक्स’ निधीवरही मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुणाच्या राजकीय दबावाने बडनेरा मतदारसंघातील विकासकामे रोखल्यास आता संबंधितांची खैर नाही, अशी तंबी वजा इशारा आमदार रवि राणा यांनी गुरुवारी महापालिकेत दिला. आयुक्तांसह विभागप्रमुखांचाही त्यांनी विविध मुद्द्यांवर क्लास घेतला. राजापेठ उड्डाणपूल निर्मितीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. दाेन वर्षांचे पाच वर्षे झाली असतानाही उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही. छत्री तलाव व बेलपुऱ्याकडे जाणाऱ्या मार्गाचे बांधकाम रखडल्याने आमदार राणा प्रचंड संतापले. कुणाच्या पत्राने हे थांबविले, ते पत्र मला द्या, असा सवाल त्यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांना केला. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. दिरंगाईमुळे कंत्राटदार चाफेकरकडे असलेल्या २९ लाखांच्या निधीचा मुद्दा आ. राणांनी उपस्थित केला. प्रतिवर्ष पाच लाख रुपये शंकरनगर स्मशानभूमी जागेच्या वापरासाठीची वसुलीच्या सूचना त्यांनी दिल्या. बडनेरा मतदारसंघातील पाच कोटींचा निधी अमरावतीत कसा वळविला, महापालिका प्रशासनाने कुणाच्या दबावामुळे फाईलवर ‘रामायण’ लिहिले, यावरही आ. राणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी सुनील राणा, नगरसेविका सुमती ढोके, शिक्षण सभापती आशिष गावंडे, जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, संजय हिंगासपुरे आदी उपस्थित होते. 

खासगी बँकेत शासननिधी जमा का?केंद्र अथवा राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. ही विकासकामे ठरावीक कालावधीत होणे अपेक्षित असते. मात्र, महापालिकेतील अधिकारी हे विशिष्ट कालावधीत ही कामे पूर्ण करीत नाहीत. दोन ते तीन वर्षे विलंबाने ही कामे होतात आणि शासननिधी हा खासगी बँकेत ठेवतात. या निधीचे मिळणारे व्याज काही टक्के अधिकाऱ्यांनाही मिळते, असा आरोप आमदार रवि राणा यांनी केला. तेव्हा अनेक अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

कोरोना मृतदेहांच्या वाहतुकीचेही पैसे घेतलेशहरात आतापर्यंत कोरोनाने ५४७ बळी घेतले. या मृतदेहांचे अंत्यसंस्कार आणि दवाखाना ते स्मशानभूमी वाहतुकीचे महापालिका प्रशासनाने पैसे घेतले, असा आरोप आमदार राणा यांनी केला. याबाबत व्हिडीओ क्लिप असल्याचा दावाही त्यांनी केला. 

छत्री तलाव येथे डीपीआरनुसार कामे नाहीछत्री तलाव सौंदर्यीकरणात विकास आराखड्यानुसार कामे होत नसल्याचा आक्षेप आमदार रवि राणा यांनी घेतला. आतापर्यंत येथे झालेल्या विकासकामांचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ऑडिट करावे, असा नवा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. 

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणा