शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

संकेतस्थळावर ‘अपडेटेड’ माहिती देणे बंधनकारक

By admin | Updated: March 17, 2015 01:24 IST

माहितीच्या अधिकार अधिनियमानुसार सर्व सरकारी विभागांनी ‘कलम ४’

शासकीय विभागांचे दुर्लक्ष : माहिती अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे शासनाचे आदेशगजानन मोहोड अमरावतीमाहितीच्या अधिकार अधिनियमानुसार सर्व सरकारी विभागांनी ‘कलम ४’ अंतर्गत असणारी सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे. सर्व विभागांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश आहेत.माहिती अधिकार अधिनियम सन २००५ मध्ये लागू करण्यात आला. तेव्हापासून १२० दिवसांत कलम ४ अंतर्गत असणारी १७ विविध प्रकारांतील माहिती नागरिकांना उपलब्ध करणे अनिवार्य आहे. ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध झाली पाहिजे. मात्र अनेक शासकीय कार्यालयांद्वारा याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. सहायक जनमाहिती अधिकारी, अपिलीय प्राधिकारी नियुक्त करून त्यांची नावे कार्यालयीन वेळात दर्शनी भागात बहुतांश कार्यालयात लावण्यात आलेली नाही. त्याची तातडीने पूर्तता करावी याविषयी शासनाने आदेश बजावले आहेत. माहितीचा अधिकार कलम (४) नुसार नागरिकांना पाहिजे ती माहिती सहज उपलब्ध करून दिली पाहिजे. मात्र अनेक वर्षांपासून ती दिली नाही. हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जात असल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. संकेतस्थळावर माहिती अद्ययावत केली जात नाही. त्यामुळे शासनाने पुन्हा आदेश जारी केलेले आहे. ‘एनआयसी’ विभाग नावालाचजिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र जिल्हा सूचना विज्ञान विभागाद्वारा संकेतस्थळावर माहिती 'अपडेट' राहत नाही. विशेष भूसंपादन विभाग, लेखा विभाग, ग्रामपंचायत विभाग, उपविभागीय विभाग, तहसील कार्यालयात्तील कामकाजाची माहिती नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी नावांची लिंक केवळ नावालाच संकेतस्थळावर आहेत. माहिती अधिकाराचे कलम '४ (१) ख' मध्येप्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने कोणतीही माहिती जाहीर करायची याचे स्पष्टीकरण माहिती अधिकाराचे कलम '४ (१) ख' मध्ये आहे. यासाठी या कायद्यात ढोबळमानाने १७ मुद्दे दिले आहेत. प्रशासनाला आणि सार्वजनिक संस्थांना स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रगटनाचे काम समाजासमोर सादर करण्याची ही संधी आहे. मात्र शासकीय विभागाद्वारा संकेतस्थळावर माहिती ‘अपडेट’ करण्यात येत नसल्याने शासनाला हा निर्णय घ्यावा लागला. सार्वजनिक प्राधिकरणाचे हे प्रतिबिंबकोणीही माहिती मागितली नसेल तरीही सार्वजनिक प्राधिकरणद्वारा स्वत:हून जाहीर केलेली माहिती संकेतस्थळावर देणे आता बंधनकारक आहे. यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र, संघटन, तक्ता, अधिकाऱ्यांची नावे, पत्ते, कामासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्यपद्धती, त्यासाठीचे कायदे, नियम, अभिलेख, सुविधा सवलती योजना, लाभार्थी निवडण्याचे निकष, अर्थसंकल्प यांचे प्रगटन करणे बंधनकारक आहे. संकेतस्थळच नाहीशासकीय विभागाचे संकेत स्थळच नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाला स्वत:चे संकेतस्थळ विकसित करता आले नाही. त्यामुळे माहिती मिळविण्याकरिता नागरिकांना कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. हा त्रास कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतला आहे.कलम ४ अंतर्गत दिलेली माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास शासकीय कार्यालयात जाऊन माहितीच्या अधिकारांतर्गत येणाऱ्या अर्जांची संख्या कमी होईल व अपिलावर होणाऱ्या खर्चात बचत होईल. - राजेश बोबडे,कार्यकर्ता, माहिती अधिकार.