शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दाखले आॅनलाईन ट्रान्सफर, बोगस पटसंख्येला चाप

By admin | Updated: September 20, 2016 00:22 IST

बोगस पटसंख्या दाखवून शिष्यवृत्तीसह विविध शासकीय योजनांचा लाभ विळविण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी

बदल : लाखो विद्यार्थ्यांना मिळणार आयडी, जाचातून सुटकाअमरावती : बोगस पटसंख्या दाखवून शिष्यवृत्तीसह विविध शासकीय योजनांचा लाभ विळविण्याच्या प्रकारांना रोखण्यासाठी शिक्षण विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या सरल संगणक प्रणालीद्वारे आता विद्यार्थ्यांना आधार कार्डशी लिंक केली जाणार आहे.याद्वारे विद्यार्थी, शिक्षक व शाळांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्याला सांकेतिक क्रमांक (आयडी) दिला जाणार आहे. या आयडीमुळे बोगस पटसंख्येला चाप बसणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे दाखलेही आॅनलाईन ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांची कागदपत्राच्या जाचातून लवकरच कामयची सुटका होणार आहे. शिक्षण विभागामार्फत शिक्षण व्यवस्थेच्या कामाकाज आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करीत पारदर्शकता आणण्यासाठी सुरू झालेल्या सरल अर्थात सिस्टीमॅटिक अँड मिनिस्ट्रेन्हीव रिफोर्मस फॉर अचिन्हिंग लर्निंग बाय स्टुडंट या संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थी शिक्षक व शाळा याची सर्व माहिती 'अपलोड' करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीला आता आधार कार्डची जोडणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीला आता आधार कार्डची जोडणी केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र ओळख क्रमांकाचे कार्ड मिळणार आहे. एकदा मिळालेला आयडी हा कायम राहणार आहे. एक च विद्यार्थी दोन शाळांमध्ये प्रविष्ट राहू शकत नाही. त्यामुळे बोगस पटसंख्या दाखवताच येणार नाही. एवढेच नव्हे तर सरलमुळे एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेत प्रविष्ट होण्यासाठी आता दाखला देण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांच्या आयडीद्वारे 'आॅनलाईन ट्रान्सफर' होणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कामगदपत्रांच्या जाचातून विद्यार्थी पालकांसह शिक्षकांची सुटका होणार आहे. शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यातखात्यात वळल्यामुळे व आधार कार्डची जोडणी झाल्यानंतर शासनाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती वाटप प्रक्रियेत पारदर्शकता येऊन गैरप्रकारांना आळा बसणार आहे.जिल्ह्यात १ हजार ६०२ शाळा असून यामधील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश शाळांमध्ये आधार नोंदणी मोहीम राबविली आहे. उर्वरित शाळांमध्ये मोहीम सुरू होणार आहे. त्यानंतर सरल प्रणालीत आधार लिंक केली जाईल.- एस.एम.पानझडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, अमरावती