शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

आयुक्तांनी नाकारला रस्ते हस्तांतरणाचा मुद्दा

By admin | Updated: April 19, 2017 00:06 IST

रस्ते हस्तांतरणाचा कुठलाही प्रस्ताव महापालिकेसमोर सध्या तरी नाही. आल्यास तो सभागृहासमोर ठेवला जाईल, ...

महामार्गांचा हत्ती पोसायचा कुणी? : नगसेवकांचा विरोधअमरावती : रस्ते हस्तांतरणाचा कुठलाही प्रस्ताव महापालिकेसमोर सध्या तरी नाही. आल्यास तो सभागृहासमोर ठेवला जाईल, असे आयुक्तांनी आमसभेदरम्यान मंगळवारी स्पष्ट केले. नवसारी ते अमरावती शहरात येणारा कॅम्प शॉर्ट रोड राज्यमार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करून घेण्याची मनपा प्रशासनाची योजना आहे काय, असा प्रश्न मंगळवारच्या आमसभेत प्रशांत डवरे यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने महापालिकेकडे रस्ता हस्तांतरित केल्यास त्याची देखरेख ठेवण्याइतपत मनपाची आर्थिक स्थिती बळकट आहे काय, जर नसेल तर मनपा प्रशासनातर्फे राज्य मार्ग हस्तांतरण रोखण्याबाबत काय प्रयत्न झालेत, अशी विचारणा डवरे यांनी केली. त्यावर महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केवळ ‘नाही’असे उत्तर दिले. त्याचवेळी डवरे आणि प्रशासनामध्ये खडाजंगी झाली.आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे मिळाले असले तरी अन्य दोन उपप्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, अशी विचारणा करीत डवरे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. बांधकाम विभागाचे रस्ते हस्तांतरित करून त्यांची देखभाल-दुरूस्ती करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे काय, याचे उत्तर मात्र डवरेंना मिळाले नाही. तथापि असा प्रस्ताव आल्यास तो सभागृहासमोर ठेवण्यात येईल,असे आयुक्तांनी स्पष्ट केले. यात बसपचे गटनेते चेतन पवार यांनी असा एक प्रस्ताव यापूर्वीही सभागृहासमोर आला होता.‘स्वीकृत’वरून खडाजंगी अमरावती : तो फेटाळण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सभागृहात दिली. रस्ते हस्तांतरणाबाबत ‘लोकमत’ने चालविलेल्या वृत्तमालिकेचा संदर्भ देऊन बसपचे गटनेते चेतन पवार यांनी याबाबत प्रशासनाला विचारणा केली. रस्ते हस्तांतरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे की नाही, हा प्रश्न गौण ठरत असल्याचे आयुक्त म्हणाले. मद्यविक्रीपासून मिळणारा कोट्यवधींचा महसूल वाचविण्याकरिता रस्त्यांची मालकी बदलविण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे.पाच स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय मंगळवारच्या आमसभेत ठेवला होता. मात्र, प्रशासनाने हा विषय स्थगित ठेवण्याचा मुद्दा मांडला. स्वीकृत सदस्य निवडायचेच नव्हते, तर विषय पत्रिकेत विषय का ठेवला, असा प्रश्न विलास इंगोले यांनी उपस्थित केला. स्थायीचे सभापती तुषार भारतीय यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली. शाब्दिक वादावादीनंतर हा विषय पुढच्या आमसभेत ठेवण्याचे निर्देश पिठासीन सभापतींनी दिले. स्वीकृत सदस्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित असल्याने आमसभेत स्वीकृत सदस्यांची निवड केलेली नाही. महानगर पालिकेच्या मंगळवारच्या आमसभेत चारही विषय समिती सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.महिला तथा बाल कल्याण समितिमध्ये जयश्री कुऱ्हेकर, नीलिमा काले, वंदना कंगाले, साहेब बी कय्युम शाह, कुसुम साहू, रेखा भुतड़ा, संगीता बुरंगे, नीता राऊत, जयश्री डहाके यांचा समावेश आहे.विधी समितीत सुनंदा खरड, सुमति ढोके, प्रणित सोनी, संजय वानरे, वंदना हरणे, मोहम्मद साबिर, आस्मां फिरोज, हफीजाबी नूर खां तथा मंजुषा जाधव यांचे वर्णी लागली आहे.तर पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिति चेतन गावंडे, गीता पडोले, पद्मजा कौंडण्य, स्वाती कुलकर्णी, विजय वानखड़े, अफजल हुसैन, सलीम बेग, अब्दुल वसीम मजीद तथा डॉ. राजेन्द्र तायडे यांना समावेश आहे.. शहर सुधार समितीत शिरीष रासने, राजेश साहू, गोपाल धर्माले, अजय सारसकर, नूतन भुजाड़े, रूबीना तबस्सुम हारून अली, सुनीता भेले, प्रशांत डवरे तथा भारत चौधरी यांना संधी देण्यात आली आहे.वृक्ष प्राधिकरणावर ९ सदस्य आमसभेदरम्यान वृक्ष प्राधिकरणावर ९ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. नव्याने निवडण्यात आलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे श्रीचंद तेजवाणी, अजय गोंडाणे, धीरज हिवसे, प्रमिला जाधव आणि वंदना मडघे यांच्यासह एमआयएमचे अब्दुल नाजिम, काँग्रेसचे प्रशांत डवरे आणि प्रदीप हिवसे आणि शिवसेनेचे प्रशांत वानखडे यांचा समावेश आहे.