असदपूर : सापन व चंद्रभागा नदीच्या मेळावर सांगवा येथे धरणाचे काम सुरू असून धरणाच्या बुडीत क्षेत्रात बरीच जमीन जात असल्याने पुनर्वसनासाठी नियुक्त केलेली गावठाणची जागा बदलविण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. असदपूर व शहापूर येथील पुनर्वसनासाठी संबंधित गाव पुढारी तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ज्या परिसरात विद्युत पॉवरची मोठी लाईन गेली त्याच परिसरात गावाबाहेर दारू दुकानाचे काम सुरू आहे. गावठाण जागेवर सर्व अल्पभूधारकांचीच शेती आहे. लागून लेंडी नाला व मोठमोठे नाले सुद्धा आहेत. ती जागा देण्यास शेतकरी असमर्थ आहे. कारण त्यांचेकडे तेवढीच शेती आहे. ते पूर्णत: भूमिहीम होत आहे. त्या जागेऐवजी गव्हाण रस्ता, निंभारी बस थांब्याकडील जागा देण्यात यावी या जागेची नेमणूक करतेवेळी काही शेतकरी व मध्यम प्रकल्पाचे अभियंता यांचाच पुढाकार असून राजकीय दृष्टिकोनातून ही जागा देण्यात येत असल्याचे समजते. ही जागा तहकूब करवून गव्हाण रस्ता किंवा निंभारी बसस्टॉपकडील जागा पुनर्वसनाकरिता देण्यात यावी. या मागणीकरिता येथील अल्पभूधारक शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भ संघर्ष संघटनेच्यावतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ संघर्ष संघटनेचे अध्यक्ष कलीमभाई सौदागर यांनी दिला आहे. यावेळी उत्तम बडवाईक, बेबीताई ना. बांगळे, सुनीता संजय भुयार, सादीक अताउल्ला, भीमराव चौधरी, संजय तापडीया, अरूण चौधरी, रुपराव भुयार, देवराव भुयार, माणिकराव काळे, बंडू काळे, बाळू दा. काळे, गोपाल गु. मुंदाणे व शेतकरी उपस्थित होते. निवेदनाची प्रत आयुक्त कार्यालय, जिल्हा अधिकारी एस. पी. ओ. अधिकारी, तहसीलदार, आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले, चंद्रभागा प्रकल्प अधिकारी यांना सादर केली आहे. (वार्ताहर)
असदपूर गावठाण जागेचा वाद पेटला
By admin | Updated: March 15, 2015 00:35 IST