शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील पापळ प्राथमिक आरोग्य केंद्राला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 10:53 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देभारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे हे जन्मगाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.पापळ येथील आरोग्य केंद्र १९८४ ला स्थापन झाले. ४ जानेवारी १९८८ ला इमारतीचे बांधकाम करण्यात आले. ३० वर्षे जुनी इमारत असली तरी स्वच्छ व सुंदर परिसर आणि दर्जेदार आरोग्य सेवेमुळे आरोग्य केंद्राला सन २०१०-११ व सन २०१३-१४ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार दोनवेळा प्राप्त झाला आहे. राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार सन २०१६-१७ व सन २०१७-१८ करिता सलग पटकावला आहे. संस्थात्मक प्रसूती व राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये मागील चार वर्षांपासून अमरावती जिल्ह्यात प्रथम पुरस्कार मिळतो आहे. तालुक्यामधील शासकीय संस्थांमधून फक्त पापळलाच हे मानांकन मिळाल्याबद्दल रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जि.प. सदस्य अनिता अडमाते, नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले तसेच गावकऱ्यांच्यावतीने येथील सरपंच विजय अजबले यांनी वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.या मानांकनाकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. मुरादे, डॉ. अभिषेक नायडू तसेच सुधीर बाळापुरे, निर्मला लकडे, खांडेकर, अडमाते, विशाल राठोड, अमोल ढेरे, केंद्रे, गायकवाड, ठाकरे, गोरले, गौरखेडे, डाहाळे, गेडेकार, हतनापुरे या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्व कर्मचाऱ्यांची सांघिक मेहनत व सहकार्य तसेच जनतेस देण्यात आलेल्या दर्जेदार आरोग्यसेवेमुळेच आयएसओ मानांकन मिळाले. यापुढेसुद्धा आरोग्य केंद्राची सेवा अशीच दर्जेदार राखण्याकरिता सर्व कर्मचारी प्रयत्न करतील.- डॉ. डी.एस. मुरादे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पापळ

टॅग्स :Healthआरोग्य