शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘इर्विन’चे वाॅर्ड हाऊसफुल्ल; रुग्णांवर व्हरांड्यात उपचार

By उज्वल भालेकर | Updated: May 6, 2023 18:04 IST

Amravati News जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील सर्जरी तथा अस्थिरोगाशी संबंधित असेलेले वाॅर्ड हाऊसफुल्ल झाल्याने काही रुग्णांवर व्हरांड्यातच खाली गादीवर उपचार केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उज्वल भालेकर अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील सर्जरी तथा अस्थिरोगाशी संबंधित असेलेले वाॅर्ड हाऊसफुल्ल झाल्याने काही रुग्णांवर व्हरांड्यातच खाली गादीवर उपचार केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरही तपासणी न करताच नागपूरला रेफर करत असल्याचा आरोप काही रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. रुग्णालयात बेडच उपलब्ध नसल्याने आरोग्य प्रशासनही हतबल असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) हे जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय रुग्णालयांसाठीचे रेफर सेंटर आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी याच रुग्णालयात दाखल केले जाते. परंतु, रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांना कशी योग्य आरोग्य सेवा पुरवावी, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनापुढे आहे. अपघातग्रस्त (अस्थिरोग) रुग्णांसाठी असलेले वाॅर्ड क्र. १२ मध्ये एकूण १८ बेडची सुविधा आहे, परंतु, याठिकाणी ३६ रुग्ण उपचारासाठी दाखल असल्याने काही रुग्णांवर व्हरांड्यात उपचार सुरू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच शस्त्रक्रिया व अस्थिरोगसाठी असलेले वाॅर्ड क्र. १३, १४, १५ देखील हाऊसफुल्ल असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे अशा या गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

एका शिफ्टला एकच परिचारिकाप्रत्येक वाॅर्डामध्ये एका शिफ्टमध्ये एकच परिचारिका कर्तव्य बजावत असून, तिलाच सर्वच जबाबदारी पार पाडावी लागते. साधारणता सात रुग्णांमागे एक परिचारिका असणे गरजेचे आहे. परंतु, रुग्णालयातील परिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने एका परिचारिकेला वाॅर्डात भरती असलेल्या सर्वच रुग्णांची नोंद ठेवणे, त्यांना वेळोवेळी औषधोपचार करणे, सलाईन लावणे, रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविणे ही सर्व कामे करावी लागतात. वाॅर्ड क्र. १२ मध्ये भरती असलेल्या ३६ रुग्णांची जबाबदारी ही एका परिचारिकेलाच सांभाळावी लागत आहे.अशी आहे रुग्णालयातील रुग्ण संख्या

जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातग्रस्त तसेच अस्थिरोगाशी संबंधित रुग्णांसाठी एकूण ५ वाॅर्ड आहेत. शनिवारी वाॅर्ड क्र. १२ मध्ये क्षमता १८ रुग्णांची असून ३६ रुग्ण दाखल, १३ मध्ये २१ बेडची क्षमता असून भरती रुग्ण २४, वाॅर्ड. क्र १४ मध्ये १६ ची क्षमता असून भरती रुग्ण २६, वाॅर्ड क्र. १५ मध्ये ३० बेडची क्षमता असून ३० रुग्ण दाखल आहेत, तर वाॅर्ड क्र. १६ मध्ये मात्र बेड रिकामे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

वर्षाभरापूर्वी पाठविला ७०० बेडचा प्रस्तावजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या तुलनेत बेडची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णालयाची क्षमता ही सातशे बेडची करण्यात यावी, असा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. प्रस्ताव पाठवून एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे, मात्र अजूनही हा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला नाही.

 

रुग्णालयात भरती झालेल्या सर्वच रुग्णांना योग्य आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम रुग्णालयातील डॉक्टर करतात. परंतु, बेडची संख्या कमी असल्याने काही रुग्णांना खाली गादीवर झोपावे लागत आहे. बेड वाढविण्याची मागणी केली आहे.डॉ. नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल