शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन 'हाऊसफुल्ल' रुग्णांना बेड मिळेना; अमरावतीमध्ये रुग्णांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:57 IST

वातावरण बदलाचा परिणाम : जलजन्य व कीटकजन्य आजाराचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मागील काही दिवसांत वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम हा आरोग्यावर पडला असून रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) मधील मेडिसिन वॉर्डमध्ये एका बेडवर दोन रुग्ण असल्याचे पहायला मिळत असून काही रुग्णांवर खाली जमिनीवर गादी टाकून उपचार केल्या जात आहेत.

इर्विनची रोजची ओपीडी ही एक हजार ते बाराशे रुग्णांची आहे. रोजच या ठिकाणी आवश्यक असलेल्या शेकडो रुग्णांना भरती देखील केले जाते; तसेच शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळत असल्याने या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने दरवर्षीप्रमाणे कीटकजन्य; तसेच जलजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढल्याने रुग्णालयातील ओपीडी; तसेच 'आयपीडी'मध्येही वाढ झाली आहे. महिला मेडिसीन वॉर्ड, पुरुष मेडिसीन वॉर्डामध्ये भरती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणी एका बेडवर दोन रुग्ण भरती आहेत. पुरुष मेडिसीन वॉर्ड क्र. १३ मध्ये एका बेडवर दोन रुग्णांवर उपचार सरू होते.

लहान मुले आजारीवॉर्ड क्र. ५ हा लहान मुलांचा वॉर्डसुद्धा रुग्ण बालकांमुळे हाऊसफुल्ल आहे. उघड्यावरील पदार्थ, तसेच दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एकच परिचारिकामेडिसीन वॉर्डामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. परिचारिकांवरील कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वॉर्डातील एकच परिचारिका ही भरती असलेल्या सर्वच रुग्णांना आरोग्य सेवा देत आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल