शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनमधील डॉक्टरला मारहाण करणाऱ्या त्रिकुटाला दंडाची शिक्षा

By प्रदीप भाकरे | Updated: October 4, 2023 17:57 IST

१ एप्रिल २०१८ ची घटना : एकुण २७ हजार रुपयांचा दंड

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयामधील डॉक्टरला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात येथील तिघांना प्रत्येकी ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ५) ए. एस. आवटे यांच्या न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी हा निर्णय दिला.

स्वप्निल प्रभाकर साव, पीयूष सुभाषराव वसू व अनिरुद्ध सुधाकर बोबडे (सर्व रा. अमरावती) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयीन दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी १ एप्रिल २०१८ रोजी रात्री डॉ. तारासिंग परशराम आडे हे जिल्हा सामान्य रूग्णालयात कर्तव्यावर होते. त्यावेळी रुग्णालयात दाखल एका रुग्णाचे नातेवाईक असलेले आरोपी हे डॉ. तारासिंग आडे यांच्याजवळ गेले. त्यांनी त्यांना रुग्णाची तपासणी करण्यास सांगितले. त्यावर डॉ. आडे यांनी कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याला तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, रुग्णाची प्रकृती बिघडल्याने त्यासाठी डॉ. आडे यांना जबाबदार धरत आरोपींनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी आडे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले.

सहा साक्षीदार तपासले

या प्रकरणात न्यायालयात सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिनही आरोपींना कलम ३३२ अन्वये प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ५ महिने साधा कारावास, कलम ३५३ अन्वये प्रत्येकी ४ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सोनाली सुबोध क्षीरसागर यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय वाठ व अरुण हटवार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीdoctorडॉक्टर