शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वरूड मध्ये सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:03 IST

संजय खासबागे ।आॅनलाईन लोकमतवरुड : संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वरूड तालुक्यात सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, दुसरीकडे ड्रायझोनमुळे जमिनीखालील उपशावर बंदी आहे, तर तब्बल १० वर्षांपासून सिंचन प्रकल्प रडतखडत आहे. २३० कोटींचा वर्धा डायव्हर्शन प्रकल्प ११०० कोटींवर गेला आहे.तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी असून, २३ ...

ठळक मुद्देदप्तरदिरंगाई : २३० कोटींचा प्रकल्प गेला ११०० कोटींवर; वर्धा डायव्हर्शन, पंढरी प्रकल्प रखडले

संजय खासबागे ।आॅनलाईन लोकमतवरुड : संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वरूड तालुक्यात सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, दुसरीकडे ड्रायझोनमुळे जमिनीखालील उपशावर बंदी आहे, तर तब्बल १० वर्षांपासून सिंचन प्रकल्प रडतखडत आहे. २३० कोटींचा वर्धा डायव्हर्शन प्रकल्प ११०० कोटींवर गेला आहे.तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी असून, २३ हजार हेक्टरमध्ये लागवड आहे. जिल्ह्यातील सिंचनाखाली असणारे मोठे क्षेत्र वरुड तालुक्यात आहे. संत्राफळे टिकविण्याकरिता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा म्हणून सुपर एक्सप्रेस वर्धा डायव्हर्शन कालव्याला २००५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. कामाला प्रारंभ होताना त्याची किंमत २३० कोटी होती. मध्यंतरी या प्रकल्पाला राजकीय ग्रहण लागले, तर आता शासनाचे दुर्लक्ष असल्याने वर्धा डायव्हर्शनसह तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे. १० वर्षांत हा प्रकल्प २३० कोटींवरून ११०० कोटीवर पोहोचला तरी काम अपूर्णच आहे. अजूनही ३० टक्के काम शिल्लक आहे.वरुड तालुक्यातील भूजल पातळी अतिउपशामुळे १२०० फुटांवर गेली होती. तालुक्यातील नद्या बारमाही वाहत्या करण्याकरिता तत्कालीन आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी शासनदरबारी वर्धा डायव्हर्शन प्रकल्पाचा प्रश्न रेटून धरला. सन २००५ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर २००८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाद्वारे १२ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. उजवा कालवा १८.५ किमी लांबीचा आहे.वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनॉल सातपुड्याच्या पायथ्याशी असून, याद्वारे पुसला ते जरूडपर्यंत सर्व नद्या बारमाही वाहत्या ठेवल्या जाणार आहे, तर डावा कालवा ३.१८ किमी लांबीचा आहे. यामध्ये उराड, सावंगी, चांदस,वाठोडा हा परिसर येणार आहे. परंतु, आता केवळ धनोडी मालखेडपर्यंतच कॅनॉल राहणार असल्याचे सांगण्यात येते. २१० हेक्टर जमिनीवर हा डायव्हर्शन साकारला जात असून, यामध्ये वनविभाग, खासगी आणि सरकारी मालकीच्या जमिनीचा समावेश आहे. या प्रकल्पाला जोड आणि जलसंचय राहावा म्हणून हर्षवर्धन देशमुख यांनी पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी, झटामझिरी, भेंमडी, पवनी प्रकल्पाची कामे मार्गी लावली. गत १० वर्षांपासून या प्रकल्पाचे तुटपुंज्या निधीअभावी काम बंद असल्याचे सांगण्यात येते. आता त्याची किंमत ११०० कोटी झाल्याचे सहायक कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांनी सांगितले. अधिग्रहित केलेल्या बुडित क्षेत्रातील जमिनीचा मोबदला देऊन पाटबंधारे विभाग मोकळे झाले. तरीसुद्धा प्रकल्पाचे काम का रखडले, हा चिंतेचा विषय आहे.निधी मिळाला; काम ठप्पआ. अनिल बोंडे यांनी पाठपुरावा करून वरूड तालुक्यातील पंढरी मध्यम प्रकल्पाकरिता ४८८.५२ कोटी, पाकनदी लघुपाटबंधारे प्रकल्पाकरिता ३५.३८ कोटी, झटामझिरी प्रकल्पाकरिता ३.६५ कोटी, भेमंडी लघू प्रकल्पाकरिता २४.९१ कोटी असे ५५२ कोटी ४६ लाख रुपये जलसंपदा विभागाकडून मिळविल्याचे खुद्द संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. तरीसुद्धा सदर प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे.प्रत्येक निवडणुकीचा मुद्दावर्धा डायव्हर्शन सुपर एक्सपे्रेस कालवा आणि पंढरी मध्यम प्रकल्पाचे काम सुरू होऊन दोन पंचवार्षिक निवडणुका झाल्या. प्रत्येकवेळी हाच मुद्दा होता. तरीही प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात आहे. पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता सावंग यांनी सांगितले, प्रकल्पाची किंमत ११०० कोटी रुपये झाली आहे. ७० टक्के काम पूर्ण झाले. ३० टक्के काम होत असून, कामाचे डिझाइन आलेले नाही.हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर!ुप्रकल्पाकरिता जमिनी देऊन काही भूमिहीन, तर काही प्रकल्पग्रस्त झाले. आता बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीतून उत्पादन काढता येत नाही. प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या मुलांना नोकऱ्यासुद्धा दिल्या नाही.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी. कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अद्यापही डावा आणि उजवा कालवा अपूर्ण अवस्थेत आहे. त्याविरोधात पुसला परिसरातील शेतकºयांसह प्रकल्पातच आमरण उपोषणाला बसणार आहे.- विजय श्रीराव, भाजप नेते