शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

बँकेतील अनियमितता वानखडेंच्या जीवावर बेतली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:30 IST

अनियमिततेसंदर्भात लेखा परीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर बँकेच्या वर्धा शाखेत ९.८१ कोटी रूपयांचा गैरव्यवहार उघड झाला.

ठळक मुद्देपत्रपरिषद : संचालक मंडळ अनभिज्ञ कसे ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनियमिततेसंदर्भात लेखा परीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर बँकेच्या वर्धा शाखेत ९.८१ कोटी रूपयांचा गैरव्यवहार उघड झाला. तत्पूर्वी संपूर्ण संचालक मंडळ त्या अनियमिततेपासून अनभिज्ञ असल्याचा दावा डॉ़ पंजाबराव देशमुख अर्बन को.आॅप बँकेच्या उपाध्यक्षांसह संचालक मंडळाने केला आहे. बँकेच्या वर्धा शाखेतील ती अनियमितता वानखडेंच्या जीवावर बेतल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मात्र, ९.८१ कोटींचे कर्ज संचालक मंडळाला अंधारात ठेऊन कसे काय वितरित केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.संजय वानखडे यांच्या आत्महत्येची घटना बुधवारी उघड झाल्यानंतर गुरूवारी दुपारी उपाध्यक्ष संजय खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखडे यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या वर्धा शाखेतील कोट्यवधींच्या अनियमिततेची माहिती दिली. संपूर्ण संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. वखार महामंडळाच्या गोदामात स्वत:च्या मालकीचे हजारो टन धान्य असल्याची वखार पावती देत वर्धेचे व्यावसायिक कैलास काकडे याने पंजाबराव बँकेच्या वर्धा शाखेतून कोट्यवधीचे कर्ज मिळविले. हासर्व व्यवहार बँक व्यवस्थापक अशोक झाडे यांच्या माध्यमातून झाला. लेखापरीक्षकाने याव्यवहारात अनियमिततेचा ठपका ठेवल्यानंतर हा प्रकार उघड झाला. मात्र, नेमका भ्रष्टाचार कसा घडला, हे आपण सांगू शकत नाही, असा पवित्रा संचालक मंडळाने घेतला.संजय वानखडे यांनीच या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी त्रीसदस्यीय समिती नेमली. त्यातून व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले. तर ४ सप्टेंबरला त्याबाबत वर्धा पोलिसांमध्ये तक्रार नोंदविल्याची माहिती देण्यात आली. कोट्यवधीचे कर्ज देत असताना कैलास काकडेचे ट्रॅक रेकॉर्ड तपासले नाही का, या प्रश्नावर तज्ज्ञसंचालक प्रवीण पाटील यांनी नकारात्मक उत्तर दिले.शवविच्छेदन केंद्राजवळ चाहत्यांची गर्दीअमरावती : वखार पावतीवर ते कर्ज दिल्याने संचालक मंडळासमोर ते प्रकरण आलेच नसल्याचा दावा त्यांनी केला. गोदामात असलेल्या एकूण मालाच्या किमतीवर ६० टक्के कर्जपुरवठा केला जातो. या प्रकरणात तिच प्रक्रिया अवलंबविली गेली. वर्षभर हा प्रकार उघडच झाला नाही. अहवालात ठपका ठेवण्यात आल्यानंतर संजय वानखडे यांच्या मनावर आघात झाला व त्यातून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला असला तरी बँकेच्या भागधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रपरिषदेला राजेंद्र महल्ले, शरद अढाऊ, हेमंत देशमुख, दिलीप कोकाटे, सुरेश शिंगणे, यशवंत वडस्कर आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी संजय वानखडे यांचा मृतदेह राजापेठ पोलिसांच्या मदतीने इर्विनच्या शवविच्छेदन केंद्रात बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आणण्यात आला. गुरूवारी सकाळी ११ वाजता श्वविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव दुपारी १२ वाजता त्यांच्या समर्थ कॉलनीतील घरी नेण्यात आले. सकाळपासून शवविच्छेदन केंद्राजवळ विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, बँकेचे संचालक, सहकारक्षेत्रातील नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.याप्रसंगी वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, आ. अनिल बोंडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, काँग्रेसचे सचिव संजय खोडके, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, नगरसेवक विलास इंगोले, सोमेश्वर पुसदकर, अतुल गायगोले,विजय विल्हेकर, प्राचार्य दिलीप काळे यांच्यासह विविध पक्षाचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. वैकुंठरथ दहा मिनिटे डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को.-आॅप बँकेजवळ आणण्यात आला.येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.मृत्यूपूर्वी बहिण-भावाच्या नावे चिठ्ठीसंजय वानखडे यांनी मृत्यूपूर्व बहिण आणि भावाच्या नावे लिहीलेल्या दोन चिठ्ठ्या राजापेठ पोलिसांनी जप्त केल्या. बहिणीच्या नावे लिहीलेल्या चिठ्ठीत त्यांनी नेत्रदान व देहदानाची ईच्छा व्यक्त केली. मात्र आत्महत्येनंतर दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आल्याने देहदान आणि नेत्रदान होऊ शकले नाही. पोलिसांच्या मते त्यांनी १८ सप्टेबरला सकाळी दहानंतर केव्हातरी आत्महत्या केली. देहदान शक्य झाले नाही तर आपल्या पार्थिवावर विद्युत दाहिनीमध्ये अंतिम संस्कार करावेत, अशी इच्छा त्यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली होती. त्यानुसार हिंदू स्मशानभूमितील विद्युत दाहिनीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. वानखडे यांची अंतिम यात्रा अंबापेठ क्रीडा मंडळामध्ये पोहोचल्यानंतर तेथे श्रद्धांजली वाहण्यात आली. ते या मंडळाचे सक्रीय सदस्य आणि खेळाडू होते.