शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अनियमिततेवर टाच, वाहन पासिंगचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 17:12 IST

मालवाहू वाहनांच्या दोन वर्षानंतर होणा-या योग्यता प्रमाणपत्राकरिता (पासिंग) केल्या जाणा-या तपासणीचे यापुढे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत दरपत्रक मागविले आहे. 

अमरावती : मालवाहू वाहनांच्या दोन वर्षानंतर होणा-या योग्यता प्रमाणपत्राकरिता (पासिंग) केल्या जाणा-या तपासणीचे यापुढे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत दरपत्रक मागविले आहे. केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९ च्या नियम ६२ नुसार वाहन तपासणीच्या सर्व चाचण्या घेणे आवश्यक आहे. याप्रकरणी वाहन पासिंगच्या कामकाजातील त्रुटींच्या मुद्द्यावरील जनहित याचिकेवर (क्र. २८/२०१३) निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने वाहन योग्यता प्रमाणपत्र जारी करताना होणा-या तपासणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश दिलेत. याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिका-यांना १२ सप्टेंबर २०१७ च्या पत्रान्वये सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत दरपत्रक मागविले आहे. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान एसआयटी स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत. वरिष्ठ सनदी अधिका-याच्या अध्यक्षतेखाली ही समिती राज्यातील सर्व परिवहन कार्यालयातील पासिंगचा कामाचा आढावा घेऊन अहवाल शासनास सादर करेल. पासिंग प्रक्रियेचे कामकाज, प्रत्येक मोटर वाहन निरीक्षकाकडून प्रतिदिन किती वाहनांची तपासणी केली जाते, तपासणीच्या तारखेस संबंधित निरीक्षकाची त्याकामी नियुक्ती केली आहे किंवा कसे, याबाबत व्हिडीओ रेकॉर्डिंग पूरक ठरणार आहे. 

योग्यता प्रमाणपत्र जारी करताना वाहन तपासणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परिवहन आयुक्तांच्या सूचना प्राप्त झाल्यात.-विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती