तालुक्यातील विटाळा येथून नांदगाव खंडेश्वरपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. या कामावर लाखो रुपयांची साधनसामग्री पडलेली आहे. तळेगाव दशासर, नांदगाव खंडेश्वर भागातील या महामार्गावरून लोखंड, सिमेंट तसेच विविध साहित्य काही महिन्यांपासून चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आष्टा येथे दोन दिवसांपूर्वी एका मालवाहू वाहनाने लोखंड लंपास करण्यात आल्याची तक्रार मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार श्याम वानखेडे यांच्याकडे येताच त्यांनी आष्टा येथील तीन, तर मंगरूळ दस्तगीर येथील एका आरोपीला अटक केली. या आरोपींनी साहित्य चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक उपनिरीक्षक साहेबराव ठावरे करीत आहेत
समृद्धी महामार्गावरील लोखंड, डिझेल चोरणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST