शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

२४ दिवसांपासून आयपीएस यादव फरार, आश्रय कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 22:16 IST

वाळू कंत्राटदारावर दोषारोपपत्र दाखल करताना मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी नांदेडच्या इतवारा उपविभागाचा सहायक पोलीस अधीक्षक जी. विजयकृष्ण यादव याच्या साथीदाराला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. याप्रकरणी यादववरही गुन्हा दाखल आहे. मात्र, तो...

अमरावती - वाळू कंत्राटदारावर दोषारोपपत्र दाखल करताना मदत करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी नांदेडच्या इतवारा उपविभागाचा सहायक पोलीस अधीक्षक जी. विजयकृष्ण यादव याच्या साथीदाराला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. याप्रकरणी यादववरही गुन्हा दाखल आहे. मात्र, तो २४ दिवसांनंतरही फरारच असल्याचे एसीबीकडून सांगण्यात येत आहे. आयपीएस यादवचा १४ फेब्रुवारी रोजी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र, एसीबीच्या पथकाला आयपीएस यादव गवसला नाही. लाच स्वीकारणारा मध्यस्थी सन्नीसिंग बंगुईला एक दिवसाची कोठडी सुनावल्यानंतर २ फेब्रुवारीला जामीन मंजूर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, एसीबीच्या तपास अधिकाºयांनी न्यायालयात मांडलेले प्रमुख तीन मुद्दे, ज्यामधील यादव यांनी सुरुवातीला लाच मागणाºया व्यक्तीला भेटायला आणलेली गाडी (क्र. एपी२१/व्हीडी५९९१), यादव याच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप पैशांची मागणीबाबतचे चार्टिंग व फिर्यादी यांच्याकडून याआधी घेतलेल्या एक लाख रुपये जप्त करायचे असल्यामुळे आपीएस यादव यांना अटक करणे भाग आहे. तरीसुद्धा यादव मागील काही दिवसांपासून फरार असल्यामुळे त्याला कुण्या राजकीय नेत्यांचा किंवा पोलीस विभागातील अधिकाºयांचा आश्रय तर नाही ना, असा संशय बळावला आहे. याबाबत लाचलुचपत अमरावती विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क केला असता आरोपी आयपीएस यादव याच्या फरारबाबत बोलणे न केल्यास बरे, असे सांगण्यात आले.

यादव उच्च न्यायालयात जाणार !नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आरोपी आयपीएस यादव दाद मागणार, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती