शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएस चौकशी पथकाचा एसपी कार्यालयात तीन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:10 IST

धारणी पोलिसांच्या तपासातील बारकावे तपासले, अपर पोलीस महासंचालक मुंबईकडे रवाना अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या ...

धारणी पोलिसांच्या तपासातील बारकावे तपासले, अपर पोलीस महासंचालक मुंबईकडे रवाना

अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेच्या चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षेखाली गठित चार सदस्यीय चौकशी पथकाने बुधवारी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तीन तास ठिय्या मांडला. धारणी पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची या पथकाने तपासणी केली. सकाळी १० ते १ वाजता दरम्यान हे पथक एसी कार्यालयात होते.

दीपाली आत्महत्याप्रकरणी गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यावर भादंविच्या ३०६ कलमान्वये गुन्हा नोंदविला. तसेच शिवकुमार याचे निलंबन झाले असून, सध्या तो कारागृहात बंदीस्त आहे. मात्र, निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी समाजमनाचा रेटा वाढत आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने रेड्डींच्या भूमिकेची चौकशीसाठी अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या अध्यक्षतेत प्राथमिक चौकशी पथक गठित केले आहे. या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस या चमूने दीपाली प्रकरणाशी निगडित लोकांचे बयाण नोंदविले. २६ एप्रिल रोजी चौकशी पथक प्रमुख आयपीएस डॉ. प्रजा सरवदे अमरावतीत दाखल झाल्यात. याच दिवशी दीपाली यांच्या पतीचे नोंदविलेल्या बयाणांचे ‘क्रॉस चेकींग’ करण्यात आले. २७ एप्रिल रोजी सरवदे यांनी हरिसाल गाठले. दीपालीचे शासकीय निवासस्थान, वनकर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. काही स्थळांवर भेटी दिल्यात. स्थानिकांशी संवाद साधला. आता आयपीएस डॉ. सरवदे यांना ३० एप्रिलपर्यंत राज्य शासनाकडे चौकशी अहवाल सादर करावा लागणार आहे. सरवदे या बुधवारी सकाळी ९ वाजता मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. मात्र, पथकातील चमूने एसपी कार्यालय गाठले आणि दीपाली प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली.

-------------------

पथकाची चौकशी गोपनीय, प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले

आयपीएस डॉ. प्रज्ञा सरवदे यांचे चौकशी पथक २१ ते २८ एप्रिल या दरम्यान अमरावती, हरिसाल येथे दौऱ्यावर होते. मात्र, या आठ दिवसांत प्रसारमाध्यमांशी कुणीही बोलले नाही. नोंदविलेले बयाण, कागदपत्रांची पडताळणी, मेळघाट व्याघ्र कार्यालयात कागदपत्रांचे सर्चिंग, एसपी कार्यालयात तपास, धारणी पोलिसांसोबत चर्चा आदी दीपाली आत्महत्या प्रकरणाशी संबंधित बाबी अतिशय गेपनीय ठेवण्यात आल्या आहेत. जे काही चौकशीत असेल ते राज्य शासनाला अहवालाद्धारे सादर केले जातील, एवढेच टिपिकल उत्तर पथकाचे होते.