शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीची हॅट्ट्रिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:45 IST

महापालिकेच्या अग्निशमन विभागद्वारा दोन कोटी रुपयांच्या फायर रेस्क्यू वाहन खरेदी अनियमितताप्रकरणी विभागीय आयुक्तांपाठोपाठ जिल्हाधिकारी व नगर विकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देदोन कोटींचे फायर रेस्क्यू वाहन : नगर विकास, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेच्या अग्निशमन विभागद्वारा दोन कोटी रुपयांच्या फायर रेस्क्यू वाहन खरेदी अनियमितताप्रकरणी विभागीय आयुक्तांपाठोपाठ जिल्हाधिकारी व नगर विकास विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीचे हॅट्ट्रिक आदेश प्राप्त झाल्याने अग्निशमन विभागातील ही खरेदी भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकल्याचे अधोरेखित झाले आहे.बाजारभावाची खातरजमा न करता आणि ६० ते ७० लाख रुपयांमध्ये मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहन उपलब्ध असताना, अग्निशमन विभागाने तब्बल २ कोटी ४ लाख रुपयांच्या निविदेला मान्यता दिली. संबंधित निधी एंटरप्रायजेसला वाहन पुरवठा आदेशही दिले.दरम्यान, या खरेदीत मोठी अनियमितता झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदविली. त्यावर नगरविकास विभागाने १५ फेब्रुवारीला महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची वस्तुस्थितिदर्शक चौकशी करण्याचे आदेश दिलेत. तत्पूर्वी, विभागीय आयुक्तांनी ३१ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहत विषयांकित प्रकरणी चौकशी करून आपला चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. ३१ जानेवारीचे हे पत्र विभागीय आयुक्तांकडून २ फेब्रुवारीला महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाले.सदर मल्टियूटिलिटी व्हेईकलची किंमत कन्सल्टंट संदीप देशमुख यांनी खोटे कोटेशन आणून त्याची किंमत २ कोटी ५ लाख रुपये केली. बाजारभावानुसार सदर वाहन ६० ते ७० लाखांत चांगल्या कंपनीकडून तयार करता येते; तक्रारीतील ही महत्त्वपूर्ण बाब विभागीय आयुक्तांनी खासकरून उद्धृत केली आहे.जिल्हाधिकाºयांनी चौकशी करताना किमतीसंदर्भात योग्य दिशेने तपास करावा, अशी विभागीय आयुक्तांची अपेक्षा आहे. नगरविकास, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी अशा तीन स्तरांवरून अग्निशमन विभागाला चौकशी अहवाल मागण्यात आल्याने यातील अनियमिततेला उजाळा मिळाला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अभ्यासपूर्ण आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.जिल्हाधिकाऱ्यांचे महापालिका आयुक्तांना पत्रविभागीय आयुक्तांपाठोपाठ जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे. मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहनाची निविदाप्रक्रिया राबविताना अनियमितता झाल्याने ती वर्कआॅर्डर रद्द करावी, या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी व त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावी, असे या पत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.नगर विकास मंत्रालयापाठोपाठ विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांद्वारे दोन कोटींच्या वाहन खरेदीची चौकशी करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने अग्निशमन अधीक्षकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. चौकशी सुरू आहे.- नरेंद्र वानखडे, उपायुक्त (सामान्य), महापालिका.