शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘बारूद गँग’च्या संपत्तीची चौकशी करा

By admin | Updated: August 18, 2015 00:10 IST

आधी ‘बारूद गँग’ आणि नंतर ‘आरडीएक्स’ च्या नावाने दहशत पसरविण्यासह तालुक्यात वाळू तस्करी आणि इतर अवैध धंदे करणाऱ्या गुंडांनी जमविलेल्या संपत्तीची चौकशी व्हावी,

‘बारूद गँग’च्या संपत्तीची चौकशी करा जनतेची मागणी : मंडळ अधिकारी, तहसीलदारांवर रोष कायमचअमरावती /अचलपूर : आधी ‘बारूद गँग’ आणि नंतर ‘आरडीएक्स’ च्या नावाने दहशत पसरविण्यासह तालुक्यात वाळू तस्करी आणि इतर अवैध धंदे करणाऱ्या गुंडांनी जमविलेल्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे. हातमजुरी करणाऱ्या वडिलांच्या मुलांकडे ट्रक, ट्रॅक्टर आणि दुचाकी व इतर संपत्ती आली कोठून? याचा तपास झाल्यास अनेक महत्त्वपूर्ण तथ्ये उघड होऊ शकतात. अचलपूर तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या रेती तस्करीबाबत विविध संघटनांनी लेखी तक्रारी महसूल विभागाकडे केल्या होत्या. पोलिसांनाही सगळा प्रकार माहित होता. तरीही रेती तस्करांवर कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी रेती तस्करांना विरोध करणाऱ्या अमित बटाऊवाले या तरूणाला नाहक जीव गमवावा लागला. त्यामुळे याप्रकरणासाठी खऱ्या अर्थाने दोषी असलेल्या मंडळ अधिकारी व तहसीलदारांवर कारवाई व्हायला हवी, असा जनतेचा सूर आहे. या दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंदविला जाऊ नये, असा उघड सवाल लोक विचारत आहेत. मंडळ अधिकाऱ्याकडे रेती तस्करांच्या वाढत्या त्रासाबद्दल वारंवार मृत अमितच्या आईने तक्रारी केल्या होत्या. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच बारूद गँगने अमितचा ‘गेम’ केला. तहसीलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांनी त्याचवेळी तक्रारीची दखल घेतली असती तर अमितचा जीव वाचू शकला असता, असा खेद आजही अचलपूरची जनता व्यक्त करीत आहे. उपविभागीय कार्यालय अचलपुरात असताना संबंधित अधिकाऱ्यांना या वाळू माफियांच्या कारवायांची दखल घ्यावीशी वाटू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे व या अनुषंगाने कारवाईची मागणी केली जात आहे. पाच आरोपी फरारच नगरसेवक मो. शाकीर हुसैन गुल हुसैन, रायुकाँ शहराध्यक्ष आबिद हुसैन, मो. शारिक अ. रहेमान, अन्वरखाँ नियामतखाँ, अशरतखाँ मुजफ्फरखाँ, मो. वाजीद अ. रहेमान, अशरफखाँ मुजफ्फर खाँ, मतीन खाँ या आरोपींना अमित बटाऊवाले हत्याकांड प्रकरणी अटक करण्यात आली आहे तर माजीद, पप्पू पठाण, जिशान अली शुटर आणि लकी या फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जुळ्या नगरीत ‘लोकमत’चे सामूहिक वाचनअमित बटाऊवाले हत्याकांडातील सत्यासत्यता पडताळून याप्रकरणाचा पाठपुरावा ‘लोकमत’द्वारे केला जात आहे. त्यामुळे ‘बारूद गँग’च्या कारवायांना कंटाळलेल्या जुळ्या नगरीतील नागरिकांनी सोमवारी ‘लोकमत’चे सामूहिक वाचन केले. दररोज पहाट होताच लोक ‘लोकमत’ची प्रतीक्षा करीत आहेत. सोमवारी काही लोकांनी परतवाड्याहून तर कुणी अमरावतीहून ‘लोकमत’ मागविला. एवढे करूनही अनेकांना ‘लोकमत’चा अंक मिळू शकला नाही.रेती तस्करीबाबत तक्रारी येताच तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाया केल्याचे रेकार्डवर नमूद आहे. रेती तस्करांवर कारवाई करणे, हे महसूल विभागाचे काम आहे. तक्रारकर्त्याला संरक्षण देणे ही आमची जबाबदारी नाही. -श्यामकांत मस्के, उपविभागीय अधिकारी, अचलपूर.