लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिला व मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार खोटी असून, या खोट्या गुन्ह्याची नि:पक्ष चौकशी करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी मंगळवारी भीम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांना निवेदनातून केली आहे.विविध वृत्तपत्रांमधून १७ डिसेंबर रोजी एका महिलेसह तिच्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या बातम्या झळकल्या. मात्र, अशी घटना घडलीच नाही, असे निवेदनात नमूद आहे. संबंधित महिला अंजनगाव सुर्जीतील रहिवासी असून, तिच्या पतीचा मृत्यू १५ वर्षांपूर्वी झाला. ती महिला राहत्या घरी देहविक्रीचा व्यवसाय करते. तिने अनेक लोकांविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हा दाखल केले आहे.२५ आॅक्टोबर रोजी सदर महिलेच्या घरातील श्वानाने शेजारी राहणाºया लीलाबाई गायगोले यांच्या घरात जाऊन विष्ठा केली. त्यावेळी दोन्ही शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी संबंधित महिलेने जातिवाचक शिवीगाळ केली. या घटनेची पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र, कोणतीही कारवाई झालेली नाही. २५ आॅक्टोबर रोजी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी संबंधित महिलेने गुड्ड्या इंगळे, शिवा, गुटक्या इंगळे नितीन घन, आशिष ढेंगे, बाबासाहेब गायगोले, नानासाहेब गायगोले, सुधीर भोरखडे व इतर लोकांविरुद्ध खोटी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविले. हे गुन्हे खोटे असून, अशी कोणतीही घटना घडली नाही. त्यामुळे या कथित घटनेची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी भीम ब्रिगेडने निवेदनातून केली. यावेळी भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांच्यासह प्रवीण मोहोड, नितीन काळे, अंकुश आठवले, ऋषीकेश उके, अनिकेत देशमुख, अक्षय मोरे, हर्षित नंदेश्वर, भारत इंगळे, शरद इंगळे, नानासाहेब गायगोले, महेंद्र इंगळे, अनिल इंगळे व नंदू गायगोले आदी उपस्थित होते.
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची नि:पक्ष चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST
विविध वृत्तपत्रांमधून १७ डिसेंबर रोजी एका महिलेसह तिच्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या बातम्या झळकल्या. मात्र, अशी घटना घडलीच नाही, असे निवेदनात नमूद आहे. संबंधित महिला अंजनगाव सुर्जीतील रहिवासी असून, तिच्या पतीचा मृत्यू १५ वर्षांपूर्वी झाला. ती महिला राहत्या घरी देहविक्रीचा व्यवसाय करते. तिने अनेक लोकांविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हा दाखल केले आहे.
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची नि:पक्ष चौकशी करा
ठळक मुद्देभीम ब्रिगेडची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन