शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन; महापालिकास्तरावर समिती स्थापन करण्याबाबत अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 07:00 IST

आतापर्यंत राज्यात २७ हजार गावांमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या स्थापन करण्यात महापालिका, जिल्हा परिषद माघारल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने घेतला आहे.

ठळक मुद्देजैवविविधता नोंदीसाठी ४० हजारांचे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: निसर्ग साखळीत अनेक जीवजंतू महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, शासन, प्रशासन स्तरावर जैवविविधता संवर्धनासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. परिणामी भूतलावरील बहुतांश जैवविविधता नामशेष होण्याची भीती वर्तविली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने आतापर्यंत २७ हजार गावांमध्ये स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली आहे. या माध्यमातून गावांमध्ये लोकजैवविविधता नोंद केली जात आहे.जैवविविधतेत प्रामुख्याने पशू, पक्षी, वन्यप्राणी, प्राणीसृष्टी, जिवंत वनस्पती आदींचा समावेश करण्यात आला आहे. जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण करण्यासाठी सन २०१२ मध्ये महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आली. जैवविविधता कायदा २००२ नुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे गठन करणे अनिवार्य आहे. त्यानुसार आतापर्यंत जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून राज्यात २७ हजार गावांमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या स्थापन करण्यात महापालिका, जिल्हा परिषद माघारल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने घेतला आहे.ग्राम समितीला हे आहेत अधिकारजैवविविधता कायदा २००२ नुसार गाव आणि परिसरात जैवविविधता संवर्धन, जतन करण्याचे अधिकार स्थानिक ग्राम समितीला बहाल करण्यात आले आहे. जीवाणू, विषाणूंचा कोणी नियमानुसार वापर करीत असल्यास स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना उत्पन्न मागण्याचे अधिकार आहेत. प्रसंगी जैवविविधता वापरास ही समिती नकार देऊ शकते, असे कायद्यात नमूद आहे.जैवविविधता नोंदीसाठी ४० हजारांचे अनुदानगावपातळीवर लोकजैवविविधतेची नोंद घेणे, त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितीला दरवर्षी ४० हजारांचे अनुदान दिले जाते. ही रक्कम महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामार्फत प्रदान केली जात असून, आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त गावांमध्ये जैवविविधता नोंदीसाठी अनुदान देण्यात आले आहे.जैवविविधता वारसास्थळ केले घोषितभूतलावर जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने काही स्थळांना जैवविविधता वारसास्थळ घोषित केले आहे. तेथील जैवविविधता सुरक्षित ठेवण्यासाठी हे मोलाचे प्रयत्न मानले जात आहेत. यात आलापल्ली येथील वनवैभव, गोंदिया, पुणे, जळगाव, गडचिरोली, मेळघाट येथील हेरिटेजचा समावेश आहे.नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून जैवविविधतेचे संवर्धन केले जात आहे. लोकजैवविविधता जतन करणे आणि त्याची नोंद घेण्यासाठी गावांना प्रत्येकी ४० हजारांचे अनुदान वितरित केले जाते. जैवविविधता संवर्धनासाठी शासनासोबत चर्चा करून त्याची अंमलबजावणीचे काम सुरू आहे.- जयंत वडतकर, सदस्य, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ.

 

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवस