अमरावती : चांदणी चौकातील फायरिंंग प्रकरणात न्यायालयाद्वारे फरार घोषित करण्यात आलेला शेख जफर याला शनिवारी नागपूर हायकोर्टातून सशर्त अंतरिम जामीन मंजूर करण्यात आली.चांदणी चौकातील फायरिंंग प्रकरणात उपमहापौर शेख जफर घटनेच्या दिवसापासून फरार होता. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी प्रयत्न केले. परंतु सुगावा न लागल्याने त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईसाठी न्यायालयातून वॉरंटही काढण्यात आला होता. दररोज पोलीस ठाण्यात लावावी लागेल हजेरी१६ जानेवारीपूर्वी न्यायालयासमोर प्रस्तुत होण्यासाठी त्याच्या रहिवासी नमुना परिसरात उद्घोषणादेखील करण्यात आली. दरम्यान पोलीस त्याच्या संपत्तीबाबत माहिती गोळा करीत होते. परंतु शनिवारी शेख जफर याला नागपूर हायकोर्टात न्यायाधीश शुक्रेच्या न्यायालयाने शेख जफर याला अंतरिम जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना शेख जफर यास दररोज दोन तास नागपुरी गेट पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. घटनेच्या साक्षीदारांवर कोणत्याही पद्धतीचा दबाव न आणता पोलिसांना तपासात मदत करण्याचेही त्याला बजावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
जफरला हायकोर्टातून अंतरिम जामीन
By admin | Updated: December 20, 2014 22:30 IST