शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

जिल्हा बँकेत 700 कोटींच्या ठेवींसह व्याज सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

आता निवडणूक लागताच विरोधक ७०० कोटींच्या ठेवी आणि ३ कोटी ३९ लाखांच्या दलालीचा मुद्दा उपस्थित करीत आहे. परंतु, हे प्रकरण आम्हीच बाहेर काढले. एमडी, सीओंवर कारवाई केली, हे बँकेच्या रेकॉर्डवर आहे, असा दावा बबलू देशमुख यांनी केला. आमच्यावर ईडी, सीडी काहीही लावा एकाही पैशाच्या भ्रष्टाचार झाला नाही. याउलट विरोधकांनी बदनामी करण्यासाठी ईडीचे कार्टून लावले, असा आरोपही त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटींच्या ठेवीसह व्याजदेखील सुरक्षित आहे. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते मतदारांची दिशाभूल करीत आहे. मात्र, ‘सहकार’चा मतदार सुज्ञ असून, ११ वर्षे आम्ही बँक कशी सांभाळली आणि शेतकऱ्यांचे कुणी भले केले, हे त्यांना चांगले ठाऊक आहे, असे मत सहकार पॅनलचे नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. सन १९९५ ते १९९९ मध्ये बँकेची धुळधाण झाली होती. विपरीत परिस्थितीत बँकेची धुरा सांभाळताना ५०० कोटींची ठेव असलेली ही बँक आता २५०० कोटींच्या ठेवीवर पोहचली आहे. ही किमया शेतकरी, ग्राहक, ठेवीदार यांच्यामुळे शक्य झाली आहे. मात्र, आता निवडणूक लागताच विरोधक ७०० कोटींच्या ठेवी आणि ३ कोटी ३९ लाखांच्या दलालीचा मुद्दा उपस्थित करीत आहे. परंतु, हे प्रकरण आम्हीच बाहेर काढले. एमडी, सीओंवर कारवाई केली, हे बँकेच्या रेकॉर्डवर आहे, असा दावा बबलू देशमुख यांनी केला. आमच्यावर ईडी, सीडी काहीही लावा एकाही पैशाच्या भ्रष्टाचार झाला नाही. याउलट विरोधकांनी बदनामी करण्यासाठी ईडीचे कार्टून लावले, असा आरोपही त्यांनी केला. दलालीचे ३ कोटी ३९ लाख रूपये पुन्हा परत आणू, असा विश्वास बबलू देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, भाजपचे प्रमाेद कोरडे, सुरेखा ठाकरे, संतोष महात्मे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रकाश काळबांडे, मोनिका वानखडे, मनीष कोरपे, पुरुषोत्तम अलोणे, हरिभाऊ मोहोड यासह सहकार पॅनलचे उमेदवार उपस्थित होते. 

जिल्हा महिला बँक, डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन बँकेचे काय झाले?जिल्हा महिला बँक, डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन बँकेची काय स्थिती करून ठेवली, याकडे विरोधकांनी लक्ष द्यावे, असा टोला बबलू देशमुख यांना लगावला. पीडीएमसी बँकेत २८ कोटींचे राईटअप नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. तालुक्याच्या ‘गारुडी’ने पतसंस्थेची वाट लावली. ७ ते ८ वर्षे पैसे गायब ठेवले, असाही आरोप देशमुख यांनी केला.

-तर संचालकांनी तक्रार का केली नाही?विरोधक संचालकांची बैठक ही ५ ते १० मिनिटात गुंडाळत असल्याचा आरोप करीत सुटले आहेत. मात्र, अशी परिस्थिती होती तर त्यावेळी संचालकांनी डीडीआरकडे तक्रार का केली नाही, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. संचालकांचे ’समाधान’ होते म्हणून बैठक ५ ते १० मिनिटात समाप्त व्हायची, असे ते म्हणाले. त्यावेळी विरोधक संचालक  काय ‘हजामपट्टी’ करीत होते, असा टोला त्यांनी लगावला.

ही अमरावतीची संस्कृती नाही : पालकमंत्री

निवडणूक येतात आणि जातात. मात्र, जिल्ह्याची वेगळी संस्कृती, ओळख असून, ही ढासळू देऊ नका. आता तर ईडीची नोटीसही चिल्लर झाली असून, यापुढे ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांना नोटीस आल्यास आश्चर्य वाटू नये, असा टोला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे लगावला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे. मात्र, निवडणुकीत ज्या पद्धतीने चिखलफेक होत आहे, ते योग्य नाही. विदर्भात अमरावती व अकोला या दोनच बँक व्यवस्थित आहेत, असे त्या म्हणाल्या. विरोधकांनी साखर कारखाने, दूध संस्था, सूतगिरणीच्या नावे कर्ज वाटप केले, त्याचे काय झाले, हे तपासून घ्यावे, असा टोला पालकमंत्री ठाकूर यांनी लगावला. ही बँक सुस्थितीत ठेवण्यासाठी आता संघर्ष म्हणून लढत असल्याचे त्या म्हणाल्या. ‘बंटी, बबली’, अपहार, लाचखोर असा शब्दप्रयोग होणे चांगले नाही, असे त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक